बाळापूर – सुधीर कुमार कांबेकर
१९ ते २५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सुशासन सप्ताहास १९ डिसेंबर रोजी सकाळी बाळापूर तहसील परिसरात साफसफाई मोहीम राबविण्यात येऊन प्रारंभ करण्यात आला.
सुशासन सप्ताहानिमित्त उपविभागीय अधिकारी अनिरूध्द बक्षी, तहसीलदार वैभव फरतारे, निवासी नायब तहसीलदार डॉ. सागर भागवत, नायब तहसीलदार, विजय सुरळकर, पुरवठा अधिकारी टाले यांचे उपस्थितीत तहसील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच ४८ जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र, ४१ उत्पन्नाचे दाखले,६५ अधिवास प्रमाणपत्र, ८ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
त्याचप्रमाणे आपले सरकार पोर्टलवरील दोन तक्रारीचे निवारणही यावेळी करण्यात आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार डॉ. सागर भागवत यांनी दिली आहे. सप्ताहा दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे