रामटेक – राजु कापसे
दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला संविधान दिनाचे औचित्य साधून रामटेक तालुका सेवानिवृत्त आदिवासी कर्मचारी यांचे अपलोना गोटूल पवनी तहसील रामटेक येथे दीडशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजनीतिक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात व धकाधकीच्या जीवनात आपले दोस्त, बालमित्र शिक्षण व नोकरीच्या कारणाने एकमेकापासून दुरावलेली आहेत. त्यांच्यात मैत्री, प्रेम, आपुलकी जवळीक व्हावी, प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाचे ठरावी कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते परंतु मैत्री दुखावतही हसवते मैत्री हे एक आपले अनमोल नाते आहे.
आयुष्याला मैत्री आणि नाती हीच खरी संपत्ती ठरत आहे. या जुन्या नाजूक व कोमळ आठवणींना उजाळा देण्यासाठी गोंडवाना बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेह मिलन व जाहीर सत्कार समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री हरीश उईके प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र गोंडवाना गणतंत्र पार्टी व जिल्हा परिषद सदस्य तसेच अध्यक्ष म्हणून श्री राजे वासुदेव टेकाम साहेब जंगल कामगार सोसायटी अध्यक्ष न्यू दिल्ली संस्थेचे सचिव श्री चंदनसिंग उईके प्रमुख पाहुणे श्री शिवराम जी भलावी श्री ताराचंद जी सलामे प्राध्यापिका सुमित्रा ताई टेकाम डॉक्टर वासुदेव वाडीवे श्री नीलकंठ जी कुंमरे गुरुजी व मोठ्या संख्येने सत्कारमूर्ती उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा सलामे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव चंदनसिंग उईके यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार सुरेश कोडवते यांनी मानले