Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यसेवानिवृत्त सैनिक व्यंकटेश वाघ यांचे शेलूबाजार- चिखली येथे जल्लोषात स्वागत...चोवीस वर्षे केले...

सेवानिवृत्त सैनिक व्यंकटेश वाघ यांचे शेलूबाजार- चिखली येथे जल्लोषात स्वागत…चोवीस वर्षे केले भारत मातेचे रक्षण…

मंगरूळपीर (ता.प्र.) – पवन राठी

तालुक्यातील चिखली येथील भारतीय सैन्यात २४ वर्ष सेवा देऊन निवृत्त झालेले चिखली (झ़ोलेबाबा ) येथील सुपुत्र व्यंकटेश राजाराम वाघ यांचे शेलुबाजार व चिखली येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सैनिक व्यंकटेश राजाराम वाघ हे भारतीय सैन्याच्या सीमा सुरक्षा बलात १८ फेब्रुवारी २००० साली सेवेत रुजू झाले.

त्यांनी भारताच्या मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, छत्तीसगड, जम्मु-कश्मीर, पंजाब, पश्चिम बंगाल, दिल्ली आदी भागात सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. भारतीय सैन्यात २४ वर्ष सेवा दिल्यानंतर ३१ जानेवारी २०२४ रोजी ते सैन्यातून निवृत्त झाले.

त्यांचे दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शेलुबाजार येथे आगमन होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित होती. सेवानिवृत्त सैनिक व्यंकटेश वाघ यांचे पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी शेलुबाजार येथील साई मंदिर ते बस स्टॅन्ड चौक अशी स्वागत रॅली काढण्यात आली.

शेलुबाजार येथील बस स्टँड चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी डि.जे.च्या देशभक्तीपर गीताने परीसर दणाणून गेला होता. त्यानंतर रॅली त्यांचे मुळगाव असलेल्या चिखली येथे येताच ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी घरासमोर रांगोळी काढून वाघ यांचे औक्षण केले व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी चिखली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनीही व्यंकटेश वाघ यांचे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. अंगणवाडी सेविका यांनी स्वागत केलेत. ग्रामपंचायत कडून स्वागत करण्यात आले. संत झोलेबाबा संस्थान येथे व्यंकटेश वाघ व कुटुंबीयांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे , निलेश पेंढारकर, विलास लांभाडे,अर्जुन सुर्वे, वर्ग मित्र सतिष राठी, राजु राऊत, बालू पाटिल राऊत, सचिन सुर्वे, संतोष लांभाडे जेष्ठ माजी सैनिक देविदास बुरकले, विवेक घोडे, विशाल बारड, अमर राऊत, नरेंद्र राऊत, दिपक घोडे, शंकर कोंगे, राजू लाटेकर,एजाज खान, उद्धव बर्माकार,

सरपंच अनिल भोसले, संस्थानचे विश्वस्त माणिकराव सावके , तुळशीराम हरणे, मांगुळकर , ज्ञानेश्वर डोंगरे गोपाल चौधरी, अविन चौधरी, सचिन वाघ, अण्णा चौधरी, गणेश राऊत, बालकृष्ण रोकडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अतिश पाटील चौधरी यांनी केले आभार प्रदर्शन अमोल वाघ यांनी केले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: