Monday, November 18, 2024
HomeMarathi News Todayनिवृत्त IPS अधिकारी दिनेश चंद्र पांडे यांचा गुदमरून मृत्यू...पत्नी आणि मुलाची प्रकृती...

निवृत्त IPS अधिकारी दिनेश चंद्र पांडे यांचा गुदमरून मृत्यू…पत्नी आणि मुलाची प्रकृती चिंताजनक…

उत्तर प्रदेश : लखनौच्या इंदिरा नगर येथील सेक्टर 18 मध्ये लागलेल्या आगीत निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांना राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले आहे. एसीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे या घटनेचे कारण सांगितले जात आहे.

सेवानिवृत्त आयजी दिनेश चंद्र पांडे (71) हे पत्नी अरुणा पांडे (68) आणि मुलगा शशांक पांडे (32) यांच्यासोबत इंदिरा नगर सेक्टर-18 मधील घर क्रमांक 28 मध्ये पहिल्या मजल्यावर राहत होते. शनिवारी सायंकाळी जेवण करून तिघेही एकाच खोलीत झोपले. रात्री साडेदहाच्या सुमारास दुसऱ्या खोलीतील एअर कंडिशनरला आग लागली. यामुळे त्या खोलीतील संपूर्ण सामान जळू लागले. ज्या खोलीत दिनेशचंद्र पांडे कुटुंबासह झोपले होते, त्या खोलीत दुसऱ्या खोलीतून धूर निघत होता. गुदमरल्याने तिघेही खोलीतच बेशुद्ध पडले. दिनेशचंद्र पांडे हे मूळचे कानपूरमधील आर्यनगरचे. तर दिनेशचंद्र पांडे यांचा दुसरा मुलगा प्रशांत बाहेर राहतो.

खोली धुराने भरली असता तळमजल्यावर राहणारे भाडेकरू अनिल यांनी आवाज काढला. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नजीकच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एसीपी गाजीपूर विजयराज सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तिघेही बेशुद्ध पडले होते. सर्वांना तातडीने बाहेर काढून लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. जिथे दिनेशचंद्र पांडे यांचा मृत्यू झाला.

नजर कानपुरी या नावाने प्रसिद्धी मिळवलेले सेवानिवृत्त आयपीएस दिनेशचंद्र पांडे हे अतिशय संवेदनशील होते आणि त्यांना शेर ओ शायरीची प्रचंड आवड होती. त्यांच्या 12 गझल खूप गाजल्या. त्यांना यूपी उर्दू अकादमी पुरस्कार, फिराक गोरखपुरी पुरस्कार आणि नझीर पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी लिहिलेले शेर जागतिक पटलावर प्रसिद्ध झाले. नजर कानपुरी या नावाने प्रसिद्ध उर्दू कवींच्या कविता संग्रहित करणाऱ्या ‘रेख्ता’ या संस्थेच्या संग्रहातही त्यांचा सहभाग होता.

डीसी पांडे यांनी लिहिलेला ‘सूरत ए शाम ए सर बज्म जला दो मुझे, सुबह हो जाए तो अनवाल से बुझा दे’ हा शेअर खूप गाजला. डीसी पांडे यांचे सुरुवातीचे जीवन संघर्षांनी भरलेले होते, तरीही डीसी कानपुरी यांनी जीवनातील प्रत्येक पैलू, प्रत्येक आव्हानाला तोंड देत एक स्थान प्राप्त केले. गणवेशाच्या मागे धडधडणाऱ्या हृदयात वाचन आणि लेखनाची आवड कायम राहिली. परिणामी ज्या गोष्टी उघडपणे सांगता येत नाहीत, त्या त्या कवितेत मांडत. दिनेशचंद्र पांडे 2009 मध्ये निवृत्त झाले होते. दिनेशचंद्र पांडे यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: