पातूर – निशांत गवई
सेवानिवृत्त नायक अश्विन सदार यांचा सन्मान सोहळ्यात पंचकोशीतील नागरिकांची उपस्थिती पातुर तालुक्यातील ग्राम चतारी येथील रविवासी नायक अश्विन भास्कर सदार यांनी आर्मी मध्ये अठरा वर्ष देशसेवा केली दरम्यान सेवा निवृत्तीचे औचित्य साधून गावातील नागरिकांनी दि.1 ऑगस्ट रोजी नायक अश्विन सदार यांचे चतारी येथील बसस्थानकावर आगमन होताच गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले.
यावेळी गावकऱ्यांनी त्याची गावातून भव्य मिरवणूक काढली यावेळी उपस्थितानी ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्याचे स्वागत केले. त्यानंतर विश्वशांती बौद्ध विहार येथे आयोजित मुख्य सोहळ्यामध्ये सुरूवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्र. डि.वाय एस पी तथा चान्नी पोलीस स्टेशन प्रभारी ठाणेदार विपुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नायक अश्विन भास्कर सदार त्यांचे आई,वडील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्यासह सर्व कुटुंबाचा सत्कार चांन्नीचे प्रभारी ठाणेदार विपुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचकावर उपस्थित पूज्य भदंत धम्मसागर, माजी सरपंच काशिनाथ सदार,ग्रा. पं. सदस्य गोपाल किर्तने,ग्रा.पंचायत सदस्य विश्वनाथ सदार ,माजी सरपंच वसंतराव लखाडे,फौजी गणेश लखाडे,पोलीस पाटील विजय सरदार,यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल सदार गुरूजी यांनी केल तर आभारप्रदर्शन सुधाकर सदार यांनी केले.यावेळी सर्व धर्मीय बहुसंख्य महीला व पुरुष यांची उपस्थिती होती.शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांने करण्यात आली.