Friday, November 22, 2024
Homeराज्यकंटेनरच्या धडकेत सेवानिवृत्त वनकर्मचारी ठार; देवलापार - महामार्गावरील घटना रुग्णवाहिके शिवाय एक...

कंटेनरच्या धडकेत सेवानिवृत्त वनकर्मचारी ठार; देवलापार – महामार्गावरील घटना रुग्णवाहिके शिवाय एक तास व्यर्थ…

रामटेक – राजु कापसे

देवलापार-राष्ट्रीय महामार्गावर देवलापार येथे दोन ट्रक्टर चालकाच्या मस्तीमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला मृतकाचे नाव गोपीचंद वाहाने वय ६१ रा देवलापार असे आहे. ते दोन वर्षापूर्वी वनविभागातून सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. याबाबत माहिती अशी की, गोपीचंद वाहाने हे नेहमीप्रमाणे फिरायला गेले होत.

ते त्यांचे मोटर सायकल क्र. एमएच ४० बीआर ८९२३ ने ग्रामिण रुग्णालय ते बस स्टॅडकडे येत होते. पाठीमागून नागपूर कडून जबलपूर कडे कंटेनर क्र. एचआर ५५ यु १४११ जात असतांना त्याचे सोबत एकमेकांना ओवरटेक करणारे एकाच कंपनीचे दोन कंटेनर जात होते. त्यातील एका कंटेनरचा कट वरील नंबरच्या कंटेनरला लागला. त्याचे संतूलन बिघडल्याने त्याने गोपीचंद यांना चिरडले. त्यांच्या पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने दोन्ही पायांचा चुराडा झाला तर मोटर सायकल फरफतट गेली त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी कठडेही तोडले.

इतका भीषण अपघात झाल्यानंतरही गोपीचंद हे रस्त्याच्या कडेला हाक देत होते. त्यांना देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयातील ट्रेचर आणून त्वरीत दाखल करण्यात आले. प्राथमीक उपचारानंतर नागपूर येथे रेफर केले. परंतू त्याआधीच त्यांनी रस्त्यातच अखेरचा स्वास घेतला. अपंग आले असते पण जीव वाचला असता गोपीचंद यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक उपचार केल्यानंतर रूग्णवाहिकेची धावपळ सुरु झाली. हायवे वरील रुग्णवाहिका बोलावण्यात आली.

ती यायला वेळ लागला परंतू दवाखाण्यात नविन रुग्णवाहिकेत मध्ये कबाडीचे सामान भरून होते. ती एका कोपऱ्यात उभी होती नागरीकांचे लक्ष तिकडे गेले. परंतू ती रुग्णवाहिका १०२ नंबर असून ती देता येत नाही असे उध्दट उत्तर डॉक्टरांनी दिले. जर एक तास आधी रुग्णवाहिका मिळाली असती तर कदाचीत रुग्ण वाचू शकला असता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. रुग्णवाहिकेबद्दल नागरीकांत रोष होता.

ती रुग्णवाहिका केवळ गरोदर महिलांसाठीच ती रुग्णवाहिका १०२ क्रमांकाची असून ती गरोदर महिलांकरीताच असते ती देता येत नाही. त्यावर डॉक्टर नाही. त्यामुळे देवू शकत नाही. त्यात सिप्टींग करीत कबाडीचे सामान भरले आहे. ते काढावे लागेल दुसरा काही ईलाज नाही. हायवेची रुग्णवाहिकाच न्यावी लागेल. डॉ बालाजी पोटे, वैद्यकीय अधिकारी ग्रामिण रुग्णालय, देवलापार.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: