भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन.
कोल्हापूर – राजेंद्र ढाले
महाराष्ट्र राज्यातील महावितरण महापारेषण महानिर्मिती या तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना इतर राज्याने कायम करण्याचा घेतलेला सकारात्मक निर्णयप्रमाने महाराष्ट्र राज्य शासनाने व आपल्या व आपण पुढाकार घेऊन कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे असे निवेदन कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी केंद्रीय संघटन मंत्री विजय कांबळे व वीज कंत्राटी कामगारांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी केंद्रीय संघटन मंत्री विजय कांबळे प्रेम सागर देसाई जय माळी व वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीज कंत्राटी कामगार 15 ते 20 वर्ष तिन्ही कंपनीमध्ये कायम कामगाराप्रमाणे काम करीत आहेत कंत्राटी कामगारांनी वीज पुरवठा हा महापुरासारख्या संकटकाळात वारं वादळात जीवाची बाजी लावून किंबहुना आपला जीव धोक्यात घालून वीज पुरवठा घराघरात पोहोचविला आहे वीज पुरवठा सुरळीत करताना शॉक लागून पडणे जोखमीचे कामे करताना अपंगत्व येणे मृत्यू होणे.
अशा घटना वारंवार घडत असतात महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपनीतील कंत्राटी कामगारांना इतर राज्याने कायम करण्याचा सकारात्म निर्णय घेतला आहे यामध्ये ओरिसा राजस्थान हरियाणा पंजाब या राज्याने कंत्राटी पद्धत बंद करून वीज कंत्राटी काम करणाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतले आहे महाराष्ट्र राज्याने कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आले आहे.