Tuesday, November 5, 2024
Homeराज्यपरराज्यातील व्यावसायिकांचा भंडारदरा महोत्सवाला उदंड प्रतिसाद...

परराज्यातील व्यावसायिकांचा भंडारदरा महोत्सवाला उदंड प्रतिसाद…

अहमदनगर/नाशिक

राज्य पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भंडारदरा वर्षा महोत्सवात परराज्यातील अनेक व्यावसायिकांनी उपस्थिती दर्शवत चांगला प्रतिसाद दिला. भंडारदरा आणि परिसराच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडलेल्या या व्यावसायिकांनी या परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा हे अतिशय निसर्ग संपन्न पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाची माहिती परराज्यातील पर्यटकांना व्हावी आणि तिथल्या सर्व लोककला आणि खाद्य संस्कृतीचा ही आनंद भारतभरातील पर्यटकांना घेता यावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने 12 ऑगस्ट पासून वर्षा महोत्सवाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.

या महोत्सवाचा एक भाग म्हणून फॅम टूर चे आयोजन केले होते. यासाठी गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, छत्तीसगड, प.बंगाल या परराज्यांमधून मोठ्या संख्येने पर्यटन व्यावसायिक उपस्थीत होते. तसेच काही समाजमाध्यम ( प्रभावक) उपस्थीत होते.

यावेळी परराज्यातील या व्यावसायिक पर्यटकांना भंडारदरा परिसराची माहिती, येथील जैवविविधता, इतिहास आणि भूगोल तसेच प्रस्तावित आणि सुरू असलेल्या साहस पर्यटनाची माहिती अभिजित अकोलकर यांनी दिली. येथील स्थळांची माहिती देणारी एक सहल दुसऱ्या दिवशी आखण्यात आली होती. न्हाणी, वसुंधरा, नेकलेस येथील धबधबे पाहून पर्यटकांना खुप आनंद झाला.

तर अमृतेश्वर तेथील मंदिराला भेट दिल्यानंतर पर्यटकांनी या मंदिराच्या वास्तू कलेचा आनंद घेतला. महाराष्ट्रातील सुमारे १२ व्या शतकातील प्राचीन मंदिराविषयी माहिती दिली. मंदिराचे बांधकाम, देवदेवता, त्यातील नक्षीकाम याविषयी माहिती देण्यात आली.. घाटघर धरणाच्या परिसरात फिरताना पर्यटकांनी जंगल, पावसाचा अनुभव, कडे कपारी, दरी, धुके या सगळ्यांची मनमुराद अनुभूती मिळवली.

यावेळी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सहसंचालक सुशील पवार यांनी देशभरातून आलेल्या पर्यटन व्यावसायिकांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. याच वेळी या कार्यक्रमाचे सह संयोजक संजय नाईक, श्वेता नाईक, संदीप मोरे, अभिजित अकोलकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधी निरंजन कुलकर्णी आणि संगीता कळसकर हे उपस्थीत होते. आदिवासी बांधवांचे पारंपारिक कलाकौशल्य, चित्रकला आणि नृत्याचा कार्यक्रम याला उपस्थितांनी आणि व्यावसायिक पर्यटकांनी मनापासून दाद दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: