कल्याण – प्रफुल्ल शेवाळे
भारतीय संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रति वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधानाच्या संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमोल योगदानातून साकार झालेल्या भारतीय संविधान निमित्त संविधान दिवस साजरा करताना,केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाने सर्व नागरिकांना संविधानबद्दल प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात अधिकाधिक सहभाग निश्चित करण्यासाठी मंत्रालयाने https://readpreamble.nic.in तसेच https://constitutionquiz.nic.in/ ही दोन वेब पोर्टल्स कार्यान्वित केली आहेत.
पोर्टल्स प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. यात कोणालाही सहभागी होऊन सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. प्राप्त प्रमाणपत्रे #SamvidhanDiwas हॅशटॅग वापरून समाजमाध्यमांवर पोस्ट करता येतील.
आमच्या न्यूज पोर्टल कडून सुद्धा आवाहन करण्यात येत आहे की, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून आपलं प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावेत…