अकोला – संतोषकुमार गवई
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या सुचने नुसार अकोला जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले यात शासनाने जाहीर केल्या प्रमाणे ४०%अनुदान वाढ आचार संहिता लागण्या पुर्वी देण्यात यावी व ग्रंथालयाची वर्गवाड दर्जा बदल त्वरीत सुरू करावी व नविन ग्रंथालयांना शासन मान्यता देणे सुरू करा इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले ग्रंथालय संघाच्या शिष्ट मंडळात प्रा एस.आर. बाहेती, राजेश डांगटे अनुराग मिश्रा , राम मुळे,रामेश्वर पोहेकर,ज्योती सरदार सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.