रिसोड पोलीस स्टेशनमध्ये आपली ओळख असल्याने त्या ओळखीचे आधारे तुझे काम करून देतो असे सांगून एका अडचणीत असलेल्या इसमांकडून लाच घेताना रिसोड तालुक्यातील एका पोलीस पाटलास वाशिम एसीबी पथकाने केली आहे.
घटनेची हकीकत अशी की, तक्रारदार याचे मुलावर रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी तो तुरुंगात आहे. त्याचे जामीनाकरिता तक्रारदार खटपट करीत आहे. अशा स्थितीत खडकी सादर ता. रिसोड जि. वाशिम येथील पोलीस पाटील प्रकाश धांडे यांच्याशी तक्रारदाराची भेट झाली. त्याची कहाणी ऐकून प्रकाश धांडे याने “रिसोड पोलीस ठाण्यात आपली चांगली ओळख आहे. त्यामुळे तुझ्या मुलाच्या जामीनाकरिता लागणारी कागदपत्रे न्यायालयात लवकरात लवकर पाठविण्यासाठी मी साहेबांना सांगतो” असे तक्रारदारास म्हटले. आणि याकरता २० हजार रुपयांची मागणी केली. त्यावर तडजोड होऊन १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने एसीबी कार्यालय वाशिम येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली.
२ डिसेंबर २०२२ रोजी सापळा रचण्यात आला. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने रिसोड येथील हिंगोली नाका स्टेट बँकेसमोर पोलीस पाटील प्रकाश कळणू धांडे याला ९ हजार रुपये दिले. हि लाच स्वीकारताना एसीबी वाशिम पथकाने प्रकाश धांडे यास रंगेहात अटक केली.
ही कारवाई मारोति जगताप पोलीस अधीक्षक, अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक, देविदास घेवारे अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. गजानन शेलके, पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी महेश भोसले पोलीस निरिक्षक, ला.प्र.वि. वाशिम तथा पोनि. महेश भोसले, पोनि सुजित कांबळे, ला.प्र.वि. वाशिम पोलीस अंमलदार- पोहवा / विनोद मारकंडे, पोहवा नितीन टवलारकर, पोहवा आसीफ शेख, पोहवा राहुल व्यवहारे, पोना / योगेश खोटे पोना रवींद्र घरत चालक पोशि/ शेख नावेद यांनी पार पाडली.