अकोला जिल्ह्यातील अकोला, आकोट,बाळापुर, मुर्तीजापुर, तेल्हारा, बार्शीटाकळी व पातुर या पंचायत समितीच्या सभापती पदाचा अडीच वर्षीय कार्यकाळ संपत असल्याने उर्वरित अडीच वर्षीय काळाकरिता सभापती निवड होण्यासाठी या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. त्याकरिता दिनांक १३ ऑक्टोबर रोजी संबंधितांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विशेष समित्यांचे सभापती) आणि, पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम १०६२ च्या तरतूदीन्वये शासनाने दिनांक १७ जुलै २०२२ पासून सुरु होणा-या उर्वरीत अडीच वर्षाच्या कालावधी करीता संदर्भिय ग्रामविकास व जल संधारण विभागाचे पत्र क्रमांक ० जि.पनि २०२१ प्र.क्र. ११८/पं.रा. २. दिनांक ४ ऑक्टोंबर २०२२ अन्वये अकोला जिल्हयातील पंचायत समिती च्या उर्वरीत अडीच वर्षाच्या कालावधी करीता सभापती पदाचे एकूण आरक्षण निश्चित करुन दिलेले आहे.
अकोला जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांचे सभापती पदाकरीता सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगतनंतरच्या दिवसापासून म्हणजेच दिनांक १७ जुलै २०२२ पासून सुरु होणा-या उर्वरीत अडीच वर्षाच्या कालावधी करीता पंचायत समितीचे सभापती पदाच्या आरक्षणा बाबत सोडतीची सभा ही दिनांक १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात आली आहे. या सोडतीच्या सभेत पंचायत समिती निहाय सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. सदर सभेस सर्व सबंधीतांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.