Thursday, December 26, 2024
Homeराज्य१६० फुट उंच मोबाईल टाॅवर वर चढलेल्या दोन उपषोण कर्त्यांना पिंजर येथील...

१६० फुट उंच मोबाईल टाॅवर वर चढलेल्या दोन उपषोण कर्त्यांना पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या रेस्क्यु टीम ने सुखरुप खाली आणले…

akl-rto-3

अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे चित्तथरारक आणी धाडसी रेस्क्यु ऑपरेशन…

अकोला – संतोषकुमार गवई

लाखनवाडा बु.ता.खामगाव जिल्हा बुलढाणा येथील धनगर समाजातील नवनित भागवत सोनाळकर आणी मेहकर तालुक्यातील सारंगपुर येथील गजानन माधव बोरकर हे दोन जण लाखनवाडा बु.गावातील हीवरखेड रोडवरील अंदाजे 200 फुट उंच मोबाईल टाॅवर वर आरक्षण संदर्भात उपोषणासाठी 13 फेब्रुवारी रोजी रात्री 1:45 वाजता वर चढुन तीथेच बसलेले होते.

14 फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांनी उपोषण सोडलेही परंतु सारखे रात्रंदिवस तीथे वरच थांबलेले असल्याने त्यांची परीस्थिती खालवली असता गलावटपणा मुळे त्यांना खाली येण्यासाठी प्रश्न निर्माण झाला होता शेवटी 14 फेब्रुवारी रोजी रात्री जिल्हाधिकारी बुलढाणा डाॅ.कीरण पाटील सर यांच्या आदेशाने निवासी उप-जिल्हाधिकारी सदाशिव शेलार सरांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव उपविभागीय अधिकारी डाॅ.रामेश्वर पुरी सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना सविस्तर माहिती दिली आणी सकाळी 7:00 वाजताच लाखनवाडा येथे येऊन रेस्क्यु ऑपरेशन चालु करण्यासाठी पाचारण केले.

आज सकाळी सर्व साहीत्यासह रेस्क्यु रुग्णवाहिका घेऊन जिवरक्षक दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार,अमित ठाकुर,विकी गाडगे हे घटनास्थळी दाखल झाले लगेच खामगाव तहसीलदार अतुल पातोळे सर यांच्या स्थानिक आदेशाने व खामगाव पो.उ.वि.अ.विनोद ठाकरे सर, हीवरखेड जिल्हा बुलढाणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास चौधरी सर, पिएसआय.रमेश धामोळे सर, पिएसआय.कीशोर बर्वे सर, आणी पोलीस कर्मचारी यांचे तसेच महसुल विभागाचे मं.अ. सुर्यकांत सातपुते साहेब, तलाठी नगराळे साहेब,तलाठी गायकवाड साहेब,तलाठी मोठे साहेब,यांच्या उपस्थितीत दिपक सदाफळे यांनी सर्व प्रथम वरती चढुन उपोषण कर्त्यांसोबत चर्चा करुन त्यांचे समुपदेशन केले.

त्यांची शरीर प्रकृती खाली उतरण्या योग्य वाटत नसल्याने त्यांना नाष्टा पाणी बोलावुन त्यांना खायला दीले नंतर वायर रोप लावुन बेस तयार केला नंतर रेस्क्यु सेटप लावुन रोप बेस फीक्स केला आणी दोन वरती आणी खाली दहा जण असे रेस्क्यु वर स्टॅण्डबाय ठेवले यानंतर जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी वाॅकी टाॅकी वरुन खाली असलेले अधिकारी यांच्याशी बोलुन दीले आणी सर्व प्रथम दोघांपैकी ज्यांची प्रकृती बिघडली होती ते गजानन बोरकर यांना हेल्मेट व बाॅडी हाॅर्नेक्स लावुन कॅराबीनरसह वायर रोपला पॅकप केले.

आणी बीले देत देत त्या व्यक्तीला जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपल्या सेफ्टी प्लॅनप्रमाणे साहस जिद्द कल्पकतेने सुखरुप खाली आणले याच पद्धतीने दुस-याही उपोषण कर्त्याला सुद्धा सुखरुप खाली आणले यावेळी उपस्थित सर्व गावकरी नातेवाईक आणी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला या धाडसी कामगीरीमुळे (साहसी जिवरक्षक) दिपक सदाफळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कारण सतत चारवेळा 160 फुट चढउतार करणे आणी त्यात ही खाली आणत आणता दोघांनाही थकवा येऊन हात पाय थकलेले घाबरलेले होते यांना जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपल्या खांद्यावर घेऊन खाली शिळीवरुन उतरत येणे म्हणजे हा एका प्रकारे दैव शक्तीचा प्रकार जाणवत होता अस मत स्थानिकांनी यावेळी व्यक्त केले.

यामध्ये विषेशतः या सयुक्त मोहीम मध्ये पोलीस मदत पथक बुलढाणा जिल्हा सहकार्य लाभले यामध्ये मा.जि.आ.व्य, अ,संभाजी पवार साहेब, श्रीकृष्ण जाधव,स.फौ.तारासिंग पवार,पो.कॉ.राजपुत,पो.कॉ. वाणी,ना.पो.कॉ पाटील,पो.कॉ गाढे,ना.पो.कॉ पटेल,पो.कॉ सोनवणे,पो.कॉ बरडे,पो.कॉ साबळे,ना.पो.कॉ कुरेशी हे सहभागी होते अशी माहिती लाखनवाडा मंडळ अधीकारी सुर्यकांत सातपुते यांनी दीली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: