एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील परमात्मा एक सेवक कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्याची व कार्यक्रम रद्द करण्यासाठी पोहचले गंगाझरी पोलीस स्टेशन येथे….
गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस स्टेशन येथे आज हजारोंच्या संख्येने परमात्मा एक सेवक एकत्रित झाले. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात बाबा बागेश्वर उर्फ धिरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन सुरु आहे. त्यांनी प्रवचन दरम्यान परमात्मा एक सेवकाचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या बद्दल अप शब्दाचा वापर आपल्या प्रवचना मध्ये केला आहे.
त्याचे विरोधात संपूर्ण नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुर, रामटेक, वर्धा, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात बागेश्वर बाबा यांच्या विरोधात परमात्मा एक सेवकाच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश निर्माण झाला आहे, प्रत्येक जिल्ह्यातील तालुकाच्या ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे,
त्याच प्रमाणे गोंदिया तालुक्यातील एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रा तील परमात्मा एक सेवकांचे कार्यकर्ते एकत्रित होऊन त्यांनी बाबा बागेश्वर उर्फ धिरेंद्र शास्त्रीच्या विरोधात नारे दिले, या नंतर सर्व कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.
तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापति रमेशजी अंबुले, हेमचंद्रजी बावणकर, रामेश्वरजी पटले, धर्मराजजी पटले, खेमलालजी रिणायत, पुरुषोत्तमजी भदाडे, राजेंद्रजी सोनेवाने , जामुवंतजी हरिणखेडे व परमात्मा एक सेवक कार्यकर्ता मोठ्या संख्या उपस्थित होते. सर्वानी निषेध जाहीर करीत धिरेंद्र शास्त्री यांना अटक करण्याची मागणी केली.