अमोल साबळे
अकोला : येथे जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी ध्वजारोहण संस्थेचे सचिव आदरणीय अभिजीत दादा कौसल यांच्या शुभ हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती सदस्य प्रकाशभाऊ कुचके, साहेबराव माहोकार, अंबादास साबळे, पर्यवेक्षक आर. बी.भगत सर, प्राचार्य शेंगोकार सर उपस्थित होते प्रास्ताविक प्राचार्य शेंगोकार सर यांनी केले.
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली जिजामाता लिटिल स्टार कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले गुणवंत विद्यार्थ्यांना याप्रसंगी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले व विविध प्रकारच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवंजाळ मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पी. पी. भगत सर यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.