पातूर – निशांत गवई
शिर्ला अंधारे येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात 74 वा प्रजासस्ताक दिन मोठया उत्साहात पार पडला. विधान परिषद सदस्य सन्माननीय अमोलजी मिटकरी ह्यांच्या शुभहस्ते व कृषी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे ह्यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला ह्याप्रसंगी नारायणरावअंधारे,राम कुमार अमानकर, सुरेश वसतकार, रामकृष्ण खंडारे,
श्रीराम वसतकर,प्रचार्य डॉ राम खर्डे, प्राचार्य मोहोड सर, प्रा शैलेश दवणे, प्रा केतकी देशमुख, प्रा रोहित कनोजे ह्यांच्या सह कृषी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कृषी तंत्र विद्यालयाचे कुलदीप अंधारे, श्री कंकाळ तसेच सर्व कर्मचारी, विद्यार्थी, विद्यारर्थीनी व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
ह्या प्रसंगी आमदार अमोलजी मिटकरी ह्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीपर व विविध विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा कृष्णाभाऊ अंधारे ह्यांनी अध्यक्षीय भाषण केले.विद्यार्थी व विद्यार्थी ह्यांनी देशभक्तीपर गीत सादर केलेत.