Sunday, December 22, 2024
Homeराज्यजीवन विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा...

जीवन विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा…

नरखेड – अंत्योदय मिशन, देवग्राम या संस्थेत,जीवन विकास परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण प्रमुख अतिथी डॉ. भूषण वासाडे ,बाल रोग तज्ज्ञ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले जीवन विकास विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. भूषण वासाडे ,बाल रोग तज्ज्ञ ,वासाडे बाल रुग्णालय, यांचा संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दिपक अरजपुरे,(सहसचिव) आणि जीवन विकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे यांनी शाल,श्रीफळ, सन्मानपत्र ,ग्रामभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे कराटे प्रात्यक्षिक ,अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष श्री मंगेश निंबुरकर आणि कराटे कोच श्री नरेंद्र बिहार यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या ग्रामभूषण पुरस्कार, सन्मानपत्र चे वाचन प्राचार्य डॉ देवेंद्र भोंगाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रविकांत बाविस्कर यांनी केले. बक्षीस वितरण श्री मनोहर कामडे नी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ दिपक अरजपुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भूषण वासाडे ,डॉ. देवेंद्र भोंगाडे, डॉ गोविंदप्रसाद दुबे,श्री संकेत ठाकरे, डॉ योगेश सरोदे, मुख्याध्यापक श्री रामभाऊ बोन्द्रे, मुख्याध्यापक श्री रविकांत बाविस्कर, प्राचार्या पूजा बोन्द्रे,,उपसरपंच श्री देवेंद्र लोहे,ग्रामपंचायत सदस्य गण म्हणून सदानंद गिरडे, रविंद्र सोनोले, श्री अतुल लोहे, श्रीमती लताताई कनिरे इत्यादी मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन विकास परिवारातील सर्वच्या सर्वच प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आवर्जून उपस्थित राहून फार मोलाचे योगदान आणि सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा बढिये यांनी केले तर आभार प्रदर्शन जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रामभाऊ बोन्द्रे यांनी केले. अशाप्रकारे, खेळीमेळीच्या वातावरणात 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: