पुणे – महाविकास आघाडीची जागावाटपाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व घटकपक्षाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवणार असल्याचे सांगितले.
त्यांनी म्हटले की, आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन आघाडी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आपले प्रतिनिधी पाठवणार आहे.
24 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासह 2 फेब्रुवारीनंतर कोणत्याही अंतर्गत चर्चा किंवा कार्यक्रमात महाविकास आघाडीद्वारे वंचित बहुजन आघाडीला सहभागी किंवा आमंत्रित केलेले नसले तरीही, आम्ही महाविकास आघाडीविषयी सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन आघाडी आज मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आपले प्रतिनिधी पाठवणार आहे.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) February 27, 2024
24 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासह 2 फेब्रुवारीनंतर कोणत्याही अंतर्गत चर्चा किंवा कार्यक्रमात… pic.twitter.com/pKFFqOwRWJ
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला आतापर्यंत निश्चित झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती देण्याची विनंती करणार आहे. या आधी 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आमच्या शेवटच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले