देवलापार – राजू कापसे
दिनांक 26 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत सोनीपत येथे देशातील प्रत्येक राज्यातून निवडलेले निवडक वैज्ञानिक प्रयोग घेऊन देशभरातील बालवैज्ञानिक सहभागी होत आहेत त्यामध्ये देवलापार सारख्या आदिवासी क्षेत्रातील दोन विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकासह सहभागी होत आहेत ही देवलापारसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन सक्षम समदृष्टी क्षमता विकास ही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे प्रांताचे प्रमुख श्री आशुतोष देशपांडे यांनी त्यांना शुभेच्छा देताना म्हटले
देवलापार सारख्या आदिवासी भागातील शिक्षण क्षेत्रात नावाजलेली. शाळा स्वामी विवेकानंद विद्यालय येथील वंश विलास मरसकोल्हे व वंश नंदकिशोर डोंगरे हे दोन विद्यार्थी तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उल्हास इटनकर हरियाणा मधील सोनीपत येथे होऊ घातलेल्या 51 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी येथे आपले वैज्ञानिक साहित्य घेऊन सहभागी होण्यासाठी आज दिनांक 24 डिसेंबर 2024 ला निघाले.
या प्रदर्शनी मध्ये महाराष्ट्र राज्यातून 5 प्रयोगांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. वंशनी दिव्यांगांसाठी उपयुक्त असे वैज्ञानिक साहित्य बनविले आहे. ज्यांच्या उपयोगाने दिव्यांगाच्या रोजच्या जीवनातील काही अडचणींवर मात करता येते.
विद्यालयाचे प्राचार्य जयंत देशपांडे, पर्यवेक्षिका रेणुका देशपांडे यांचे प्रोत्सहन तसेच स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष जयंतराव मुलमुले, सचिव अरविंद जोशी यांच्या प्रेरणेमुळे राष्ट्रीयस्तरा पर्यंत पोहचता आले उल्हास इटानकर यांनी सांगितले. या प्रसंगी वंशला शुभेच्छा देण्यासाठी रंजित मरसकोल्हे, नंदकिशोर डोंगरे, सारिका इटानकर व शुभेच्छुक उपस्थित होते.