Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayचंद्रकांत पाटलांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत संस्थेच्या वतीने दिले प्रत्युत्तर...वाचा

चंद्रकांत पाटलांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत संस्थेच्या वतीने दिले प्रत्युत्तर…वाचा

राज्यात महापुरुषांची बदनामीचे भाजपच्या वतीने जणू काही सत्रच सुरु केले कि काय? भाजपचे नेते तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे राज्यात विरोधी पक्षासह काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या होत्या. यावर कालच समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. यावर भाजपच्या काही नेत्यांनी चंद्रकांत पाटलांचे समर्थ केले होते. आता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कष्टाने उभी केलेली रयत संस्थेच्या वतीने आपली भूमिका प्रसिद्धी पत्रक जारी करून मांडलीय…आम्ही खाली दिलेली नोट मधील मजकूर जशाच्या तसे देत आहो.

महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना १०३ वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मवीरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. किर्लोस्कर, ओगले, कूपर या कंपनीमध्ये कर्मवीरांनी जे काम केले त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातील उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स,
आई- वडीलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोने, मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले. विद्यार्थ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनाने, स्वकष्टाने आपले शिक्षण पूर्ण करावे हे कर्मवीरांचे शैक्षणिक तत्वज्ञान होते. यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’ ही अभिनव योजना राबविली.

आज या योजनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. म्हणूनच ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे कर्मवीरांनी संस्थेचे ब्रीद घेतले. कर्मवीरांच्या या कार्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकसहभागातून ही शैक्षणिक चळवळ अधिकाधिक व्यापक केली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून कोट्यावधी मुलांना शिक्षण मिळाले. आज महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर दिसतो आहे त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वच कारणीभूत आहे असे म्हटले
तर अनुचित ठरणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते. याच कालखंडात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा कर्मवीरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले. या सर्व पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काल केलेले विधान अत्यंत दुर्देवी आहे. त्याचा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: