मुंबई – धीरज घोलप
घाटकोपर “एन” वार्ड हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी विभाग आहेत. या झोपडपट्टीमध्ये खूप हातावरती पोट असलेल्या गोरगरीब राहतात. असे कुटुंब आहे ज्यांना रोजगार नाही लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार गेला.
काही विधवा महिला आहेत त्यांनी आपल्या कुटुंबाचा भाग आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. असा गोरगरीब कुटुंबाची घाटकोपर “एन” वार्ड मध्ये तक्रार करून शासनाने भेटीस धरून त्यांच्याकडून तक्रार मागे घेण्यासाठी मागितली जाते खंडणी.
मात्र आता केंद्रशासनाने गोरगरीब रस्त्यावर व्यवसाय करणार्या छोट्या व्यवसायांना दहा हजार पाच लोन दिलेला आहे. मात्र एकीकडे केंद्र शासन गोरगरीब रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या कुटुंबीयांना आधार देत तर समाजातील काही गाव गुंड घाटकोपर “एन” वार्ड गोरगरीब फेरीवाल्यांची तक्रार करून तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्याकडून खंडणी मागितली जाते.