Sunday, December 22, 2024
Homeशिक्षणदुबई येथे नामांकित विद्यापीठ व आय.टी. इंडस्ट्री अँड ऑटोमोबाईल सेक्टर येथे अभ्यास...

दुबई येथे नामांकित विद्यापीठ व आय.टी. इंडस्ट्री अँड ऑटोमोबाईल सेक्टर येथे अभ्यास दौरा…

पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या १८३ विद्यार्थ्यांचा दुबई येथे निःशुल्क अभ्यास दौरा…

विद्यार्थ्यांना विमानाने निःशुल्क देश – विदेशात अभ्यास दौरा आयोजित करणारे महाराष्ट्रातील एकमेव एज्युकेशनल ग्रुप…

अमरावती – सुनील भोले

पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावती महाराष्ट्रातील एकमेव एज्युकेशनल ग्रुप कि जिथे विद्यार्थ्यांच्या कौशल्य, बुद्धिमत्ता, सर्वांगीण विकासाला वाव मिळावा तसेच नवीन देश विदेशातील प्रगत तंत्रज्ञान अभ्यासता यावे याकरिता गेल्या दशकांपासून सातत्याने निःशुल्क विदेश दौरा मूलेशिया, दुबई, सिंगापूर, जपान येथे आयोजित करण्यात येतो यामध्ये विद्यार्थ्यांचा विमानाचा प्रवास, पंचतारांकित हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था, विविध शैक्षणिक संस्थेना, उद्योगांना भेटी तसेच पर्यटन करणे हा संपूर्ण खर्च पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावतीच्या वतीने दरवर्षीच मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

यावर्षी इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, फार्मसी, कृषी, आर्कीटेक्चर, बी.ए.एम.एस. नर्सिंग मधील विद्यापीठस्तरावर व महाविद्यालया मध्ये गुणवत्ता प्राप्त असणा-या एकूण १८३ विद्यार्थ्यांकरिता निःशुल्क दुबई येथे अभ्यास दौरा व उद्योगांना भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. टप्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या बॅचेस या अभ्यास दौऱ्याकरिता दुबई येथे जाणार असून ८७ विद्यार्थ्यांची पहिली बॅच चे आज प्रस्थान होणार आहे. दुबई येथे अभ्यास दौऱ्याकरिता विद्यार्थ्यांना पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या खर्चाने जाणे येणे तसेच पंचतारांकित हॉटेल राहण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.

दुबई येथील बिट्स पिलानी, युनिव्हर्सिटी ऑफ दुबई, अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ दुबई, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम, युनिव्हर्सिटी ऑफ वालाँगगाँग दुबई सोबत शैक्षणिक करारनामा करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याना या विद्यापीठामध्ये तज्ञ व्यक्तींद्वारे अत्याधुनिक प्रयोगशाळेत प्रशिक्षण, विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन, विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आले तसेच आय.टी. इंडस्ट्री, ऑटोमोबाईल सेक्टर, आर्टिफिशल इंटेलिजन्स इंडस्ट्री, ईव्ही कंपनीज दुबई येथील विविध उद्योगांना सुद्धा भेटीचे आयोजन करण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्याच्या कौशल्यात वाढ होईल व याचा फायदा विद्यार्थ्यांच्या उत्तम नोक-या करीता होणार असल्याचे महाविद्यालयाने कळविले.

याचबरोबर पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप चे उपाध्यक्ष श्रेयशदादा पोटे पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून महाविद्यालयात विद्यार्थ्यांची नियमित हजेरी, विद्यार्थ्यांनी केलेले असायनमेंट सबमिशन, विविध चाचण्या देना-या व सर्वात जास्त वर्गात हजर असणा-या विद्यार्थ्यांकरिता भारतामधील अहमदाबाद, हैद्राबाद, दिल्ली, बंगलोर, चेन्नई, मुंबई येथे निःशुल्क विमानाने जाणे येणे व पंचतारांकित हॉटेल मध्ये राहणे, व उद्योगांना ला भेट देणे या उपक्रमाला गेल्या वर्षी सुरवात झाली झाली असून सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनअरिंग,

इलेक्ट्रीकल इंजिनअरिंग, इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रीकल्चर, बीएएमएसच्या ३०० विद्यार्थ्यांना देशांतर्गत अभ्यास दौऱ्याकरिता याचा फायदा होणार आहे आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण खर्च पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप च्या वतीने करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळावी या करीता मोठ्याप्रमाणात खर्च करणारे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे.

देश विदेशात अभ्यास दौऱ्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे व्यवस्थापक, प्राचार्य, उपप्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या असून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत देश विदेशात संस्थेकडून निःशुल्क विमानाने अभ्यास दौरा आयोजित केल्यामुळे या विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्साह व आनंद दिसून येत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: