Sunday, December 22, 2024
Homeराज्यहळदीला एनसीडेक्सच्या बाहेर काढा व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांची मागणी; खा.हेमंत पाटील यांच्या...

हळदीला एनसीडेक्सच्या बाहेर काढा व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांची मागणी; खा.हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक…

नांदेड – महेंद्र गायकवाड

मराठवाड्यातील हळद एनसीडेक्सच्या जाचक निकषात बसत नाही, शेतकऱ्यांची हळद एनसीडीईएक्स घेत नाहीत शेतकऱ्यांच्या नावावर काही ठराविक लोक प्रत्यक्ष व्यापार न करता केवळ तेजी मंदी करून हळदीचे भाव पाडत आहेत. म्हणुन NCDEX वायदे बाजारातून हळदीला बाहेर काढावे यासाठी खासदार हेमंत पाटील माजी आमदार गजानन घुगे यांच्या नेतृत्त्वाखाली नांदेड हिंगोली वसमत वाशीम येथील हळद व्यापारी,शेतकरी उत्पादक कंपन्या अडते यांची बैठक नांदेड येथे पार पडली. वेळप्रसंगी मराठवाड्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून सुरू करण्यात आलेल्या हाळदिच्या वायदे बाजारात शेतकऱ्यांच्या नावाखाली काही ठराविक लोकच लाभ उठवत आहेत. प्रत्यक्ष खरेदी विक्री न करता केवळ सौदे देऊन कृत्रिम तेजी मंदी करून हळदीचे भाव पाडण्याचे षडयंत्र गेल्या चार पाच वर्षांपासून होत आहेत त्यामुळे शेतकरी व्यापारी आडते यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शिवाय एनसीडेक्सचे निकष अत्यंत जाचक असल्याने मराठवाड्यातील व्यापा-र्यांचा, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा व शेतकर्यांचा माल पास होत नाही.

देशातील हळदीच्या उत्पादनापैकी पन्नास टक्के उत्पादन हे मराठवाडा विदर्भात होते त्यामुळे या सेन्सेक्सने आपले निकष बदलून विदर्भ मराठवाड्यातील हळद केंद्रस्थानी ठेवून निकष करावेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होइल अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केले तर लवकरच मोठे आंदोलन उभे करून बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला याबैठकिला ज्ञानेश्वर मामडे, हर्ष मालू , शेतकरी मित्र फार्मर प्रोडय़ुसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले, गोदा फार्मचे नितीन चव्हाण,आनंद मंत्री ,संदीप बाहेती, स्वप्नील मुरक्या, जुगल बाहेती श्याम मुरक्या मनोज लड्डा सुनील लड्डा, बाबुराव कदम कोहळीकर जयप्रकाश लड्डा,

गोपाल दूध प्रवीण कासलीवाल प्रल्हाद काकांडीकर, बालाजी भायेगावकर, अक्षय गोयंका ,सत्तू भराडिया ,अशोक पोवार चेपुरवार आशिष राका सुनील काबरा संजय बाहेती आलोक जाधव आनंद धुत,दीपक म्होरक्या रवी नागठाणे, राहुल नागठाणे या वेळी उपस्थित होते. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी एनसीडेएक्स, सेबी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर बोलून यात सुधारणा करण्यासंदर्भात व नांदेड येथे बैठक घेवुन स्थानिक व्यापारी शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्यांच्या अडचणी समजून घेण्याबाबत सुचना केल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: