Monday, December 23, 2024
Homeराज्यशेतकऱ्यांना दिलासा अकोला बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली शासकीय हरभरा खरेदीला मुहूर्त;...

शेतकऱ्यांना दिलासा अकोला बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली शासकीय हरभरा खरेदीला मुहूर्त; सोमवारपासून ऑनलाइन नोंदणी सुरू…

अकोला – अमोल साबळे

शासकीय केंद्रांवर खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना ८०० ते १००० रुपयाने कमी भावात हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हरभऱ्याची हमीभावाने खरेदी केव्हा सुरू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

आता हरभरा खरेदीला मुहूर्त मिळाला असून, सहरकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत दि.२४ फेब्रुवारी रोजीच्या पत्राद्वारे हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता दि. २७ फेब्रुवारी २०२३ पासून नोंदणी सुरू करावी, असे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली असून, शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी ४ हजार ५४८ क्विंटल आवक झाली आहे. हरभरा पिकाची सध्या सोंगणी सुरू आहे. शेतकन्याचा हरभरा बाजारात येत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. २४ फेब्रुवारी रोजी ४,५४८ क्विंटल आवक झाली. हरभन्याला बाजारात सरासरी भाव हा ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. हरभऱ्याचे शासकीय हमीभाव ५,३३० रुपये असून, शेतकऱ्याचे प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपयांचे नुकसान होत आहे.

त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात ओरड होत आहे. दि. २४ फेब्रुवारी रोजी सहरकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत प्रसारित करण्यात आलेल्या पत्रामध्ये आगामी सोमवारपासून हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होणार असल्याचे नमूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

१. २१ लाख हेक्टर क्षेत्राक हरभऱ्याची पेरणी जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभयाल पसंती मिळते. यंदा मुबलक पाण असल्याने जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले असून, हरभऱ्याचे पेरणी १२८ टक्के झाली आहे. जिल्ह्यात १ लाख २१ हजार १७७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. सध्या हरभरा सोंगणी व काढणी सुरु असून, उत्पादनात झाल्याचे दिसून येत आहे.

तुरीचे खरेदी केंद्र सुरु, शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

तुरीला बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असतानाही शासकीय नोंदणी दि. २१ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे हमीभाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणीकडे पाठ फिरवली असून, शेतकरी तुरीची बाजारात विक्री करीत असल्याचे चित्र आहे. हरभऱ्याचे हमीभाव जास्त असल्यासही शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: