Sunday, December 22, 2024
Homeग्रामीणग्रामीण भागातील अतिक्रमण धारकांना दिलासा…गावठाण क्षेत्रातील सर्व निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणार…३१ डिसेंबर...

ग्रामीण भागातील अतिक्रमण धारकांना दिलासा…गावठाण क्षेत्रातील सर्व निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणार…३१ डिसेंबर अंतिम मुदत…

आकोट – संजय आठवले

राज्याच्या ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्रात आणि गावठाण क्षेत्राबाहेरील विविध शासकीय जागांवर लाखो निवासी अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. त्यातील गावठाण क्षेत्रांतर्गत असलेल्या निवासी अतिक्रमणांचे वार्षिक मूल्यदर निश्चित करणे तथा त्यानुसार अतिक्रमण शुल्क भरणा केल्यानंतर ती निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास राज्य मंत्रिमंडळाने अनुकूलता दर्शविली आहे. त्याकरिता दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ही सर्व अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

सोबतच सक्षम अधिकाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीची कालमर्यादाही विहित करण्यात आली आहे. ह्या आदेशाने राज्याच्या ग्रामीण भागातील विवीध शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या ३४ जिल्ह्यातील एकुण २७,८६९ ग्रामपंचायतपैकी ८,६३७ ग्रामपंचायतीमधील गावठाण क्षेत्रात एकुण २,४१,०७० अतिक्रमण नोंदी झाल्या आहेत. त्यातील १,३५,८४९ अतिक्रमण नोंदीचे ठराव संगणक प्रणालीवर अपलोड केले आहेत. त्यापैकी १,१५,६९० ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत. मंजूर केलेल्या अतिक्रमण नोंदी गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मंजूरीकरिता पाठविल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचेकडे प्राप्त ४४,८९६ अतिक्रमण नोंदीपैकी ४०,५६७ नोंदी मंजूर केल्या आहेत. २,०१५ अतिक्रमण नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत. २,३१४ नोंदी प्रलंबित आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजूर केलेल्या एकूण ४०,५६७ नोदीपैकी २५,२४४ सःशुल्क नोंदी आहेत व १५,३२३ विनाशुल्क नोंदी आहेत. यापैकी ६,०८८ अतिक्रमणधारकांना जागा नावावर करुन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सःशुल्क नोंदीपैकी ५ अतिक्रमणधारकांनी आज पावेतो शुल्क भरलेले आहे.

राज्याच्या ३४ जिल्ह्यातील एकूण २७,८६९ ग्रामपंचायतपैकी ६,७२७ ग्रामपंचायतींच्या गावठाण क्षेत्र बाहेर एकुण ३,३६,४६३ अतिक्रमण नोंदी झाल्या आहेत. त्यातील १,७२,०७० अतिक्रमण नोंदींचे ठराव संगणक प्रणालीवर अपलोड केले आहेत. त्यापैकी १.२५,८५३ ठराव ग्रामपंचायतींनी मंजूर केले आहेत. मंजुर केलेल्या अतिक्रमण नोंदी गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मंजूरीकरिता पाठविल्या आहेत.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचेकडे प्राप्त ३४,५४४ अतिक्रमण नोंदीपैकी ११८ नोंदी मंजूर केल्या आहेत. २,९८७ अतिक्रमण नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत. ३१,४३९ नोंदी प्रलंबित आहेत.गावठाण क्षेत्राबाहेरील अतिक्रमण नोंदी मंजूरीसाठी दि. ०९ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीकडे पाठविण्यात येतात. याबाबतची नोंद संगणक प्रणालीवर करण्यात आलेली नाही.

शासन स्तरावरुन गावठाण क्षेत्राबाहेरील विविध प्रकारच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमण नोंदी १.७२,०७० पैकी गायरान क्षेत्रावर १,०५,८८० व वन विभागाच्या जमिनीवर २३,५९५ आणि सार्वजनिक वापराच्या जमिनीवर १३,०७६ अशा एकुण १,४२,५५१. एवढी अतिक्रमणे आहेत व उर्वरित ३७ प्रकारच्या जमिनीवर एकुण २९,५१९ इतकी अतिक्रमणांची नोंद आहे.

गावठाण क्षेत्रातील अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबतचे परिपत्रक देऊन अद्यापही ही अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली नाही. राज्य मंत्री मंडळाने दि. १२ ऑक्टोबर २०२२ च्या मंत्रीमंडळ बैठकीत निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करतांना विहित कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरुन राज्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी कालमर्यादा विहित करण्यात आली आहे.

ग्राम विकास अधिकारी/ ग्रामसेवक (ग्रामपंचायत स्तर) १० दिवस, गटविकास अधिकारी (तालुका स्तर)१० दिवस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा स्तर)५ दिवस, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा स्तर) ५ दिवस. या कालमर्यादेत गावठाण क्षेत्रातील निवासी प्रयोजनार्थं केलेली सर्व अतिक्रमणे नियमानुकूल करून, या जागा लाभार्थ्यांच्या नावे करण्याबाबतची कार्यवाही दि. ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत पूर्ण करण्यास बजावण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: