दानापूर – गोपाल विरघट
भूमिपूजन, लोकार्पण, विमोचन अशा प्रकारच्या पार पडणाऱ्या कार्यक्रमात राजकीय व्यक्ती, समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या हस्ते अशा प्रकारचे सोहळे करण्याची प्रथा समाजात रूढ झाली आहे.
मात्र येथिल लेखिका प्रतिमा इंगोले यांनी अगदी साध्या पद्धतीने राशाटेक या कादंबरीचे विमोचन त्यांच्या बालपणीच्या मैत्रिणीन श्रीमती पंचफुलाबाई तायडे यांच्या हस्ते केले . तत्पूर्वी राशाटेक या टेकडीची साळी, चोळी वाहून पूजनही करण्यात आले. ज्या वस्तू वर ही कादंबरी लिहली त्या ठिकाणी जाऊन विमोचन करणे अशी पहिलीच वेळ असेल, त्यानंतर स्व: बापूसाहेब ढाकरे वाचनालयाचे नवीन वास्तूत स्थलांतरण, लोकार्पण यावेळी करण्यात आले.
यावेळी लेखिका प्रतिमा इंगोले, कवी,लेखक तुलशीदास खिरोडकार सर ,श्रीमती पंचफुलाबाई तायडे , मीराताई तायडे, गरुड धाम सेवा समितीचे अध्यक्ष विश्वासराव विखे, कवी शिवराज जामोदे, भास्कर विखे सर,उपरपंच सागर ढगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू उंबरकर, प्राचार्य अरुण हागे , कवी पोहेकर , कवी गणेश भाकरे,माजी पं स.सदस्य श्रीकृष्ण विरघट,माजी उपसरपंच रविंद्र ढाकरे प्रेस क्लबचे अध्यक्ष सुनिलकुमार धुरडे ,उपाध्यक्ष शे ,राजू, गोपाल विरघट, मुकेश विखे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र तायडे, संघपाल विरघट, संतोष हागे ,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
मराठी साहित्य क्षेत्रातील ख्यातनाम लेखिका ग्रामिण भागात राहून आपल्या लेखणीच्या माध्यमातून गाव खेड्यातील चाली परंपरा , सर्वसामान्य माणसाचं जीवमान ह्या विषयावर उत्कृष्ट लिखाण सोबतच आज दानापूर गावाच्या हद्दीतील राशा टेक या टेकडीचा इतिहास या राशाटेक कादंबरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध लेखिका प्रतिमाताई इंगोले यांनी आपल्या लिखाणीच्या माध्यमातून पोहचवला, रेखाटला आहे.