रामटेक – राजु कापसे
दिनांक १४/०९/२०२३ पासून सततच्या पावसामुळे खिंडसी जलाशय पुर्ण भरलेला असुन, सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक गावात पाणी सुध्दा गेले. या पाण्यामुळे मौजा पंचाळा, महादुला, घोटी, बेरडेपार, आसोली, शिवाडोरली या गावातील शेतकर्यांच्या शेतमालांचे नुकसान सुध्दा झाले आहे.
अरोली व आसोली रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे अरोली येथे शाळेतील विद्यार्थी शाळेत जावु शकत नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर नाल्यावर मागील वर्षीसुध्दा असेच पाणी आल्याने पुल सुध्दा तुटला होता. लगेच थातुर मातुर दुरुस्त करण्यात आला होता परंतु कायम स्वरूपी व्यवस्था करण्यात आली नाही.
आता जर नाल्यावरील पाणी कमी करण्यासाठी खिंडसी जलाशयाच्या मायनरमधुन पाणी सुर नदीला सोडण्यात यावे. सदर प्रकरणात प्रकल्प संचालक (पेंच पाटबंधारे) किंवा उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क करून पाणी सुर नदीला सोडण्यात यावे. जेणेकरून रस्ते मोकळे होईल. व या ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेत पिकाची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी निवेदन कर्ते शेतकर्यांनी केली आहे.
निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी (महसूल) वंदना सवरंगपते, उपविभागीय अभियंता राजू भोंगळे यांनाही देण्यात आली आहे. रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती तथा शिष्टमंडळाचे अध्यक्ष सचिन किरपान, ऍड. प्रफुल्ल अंबादे, वीरेश आष्टनकर, अरविंद कडवे, अश्विन ठाकूर, रामू झाडे, महेंद्र दिवटे, सलीम मालाधारी, विनायक कावळे, रवी हटवार, आरिफ मालाधारी यांच्यासह संकुलातील शेतकऱ्यांचा समावेश होता.