नांदेड – महेंद्र गायकवाड
सुहाना काशिम शेख ही 7 वर्षाची बालिका बुलढाणा येथे सापडली. या बालिकेने नांदेड जिल्ह्याचा पत्ता सांगितला आहे. सध्या ती बालिका शासकीय मुलींचे बालगृह, मुरुड ता. मुरुड जि. लातूर येथे आहे. या बालिकेचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा आई-वडील असल्यास ओळखीच्या पुराव्यासह 30 (तीस) दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय,
शास्त्री नगर, नांदेड, आर. आर. कांगणे मो.क्र.9421382042 व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांचा मो.क्र. 9834049738/9730336418, संरक्षण अधिकारी संदीप फुले यांचा मो. क्र. 9011572458 याच्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
शासकीय मुलींचे बालगृह, मुरुड ता. मुरुड जि. लातूर संस्थेत बालिकेचे पुढील संगोपन व पुनर्वसनासाठी दाखल करण्यात आले आहे. ही बालिका सडपातळ बांध्याची, गोऱ्या वर्णाची, मध्यम उंचीची आहे.
30 (तीस) दिवसांच्या आत संपर्क न साधल्यास या बालिकेचे कोणीही नातेवाईक किंवा आई-वडील ह्यात नाहीत अथवा ते या बालिकेची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाहीत असे गृहीत धरुन बालिकेच्या दत्तकाची व पुनर्वसनाची कायमस्वरुपी कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यानंतर कोणाचीही कसलीच तक्रार किंवा आक्षेप राहणार नाही यांची नोंद घ्यावी, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे.