मुंबई – धाराविकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणुन प्रयास संस्थेच्यावतिने मुलुंड भागात उद्या सकाळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुलुंडकर आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनाचे आयोजक अँड. सागर देवरे यांना नवघर पोलिसांनी नोटीस दिली आहे.
अपात्र असलेल्या धाराविकारांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येणार असल्याने मोठ्य प्रमाणवार मुलुंड परिसरात घरे बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी मिठागरांची जमीन अधिग्रहन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
लाखो धाराविकारांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये झाल्यास नागरीसेवांवर याचा ताण पडणार आहे. या आधीच मुलुंड मध्ये वाहतूक कोंडीची गंभीर समस्या असून आरोग्याशी निगडीत सुविधांवरही याचा ताण पडणार आहे. त्यामुळे धाराविकरांचे पुनर्वसन धारावीतच करण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र मुलुंडकरांना ग्राह्य न धरता या ठिकाणी धाराविकरांचे पुनर्वसन याच ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, अँड. सागर देवरे यांच्या प्रयास संस्था आणि शिवसेनेच्यावतिने उद्या सकाळी मराठा मंडळ गेट, मुलुंड पुर्व या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोणत्याही प्रकारचा अऩुचित प्रकार घडू नये, घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी अँड. सागर देवरे यांना नवघर पोलिसांनी नोटीस दिली आहे.