Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनअखिल भारतीय भंडारी समाज महासंघाची नियमित सभा श्री. नविनचंद्र बांदिवडेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली...

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाची नियमित सभा श्री. नविनचंद्र बांदिवडेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २० जुलै रोजी आयोजित…

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाची नियमित सभा श्री. नविनचंद्र बांदिवडेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शनिवारी दि. २० जुलै २०२४ रोजी संध्या.६.३० वा. कित्ते भंडारी मंडळ, दुसरा मजला, शिवाजी पार्क, दादर मुंबई ४०००२८ येथे आयोजित केली आहे.

ह्या सभेत उत्तर गोवा लोकसभा मतदार क्षेत्रातून एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेले भंडारी समाजातील लोकप्रिय खासदार आणि ज्यांची नुकतीच मोदी सरकार मध्ये मंत्रिपदावर वर्णी लागली असे श्री. “श्रीपादजी नाईक” ह्यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यांचा विशेष सत्कार सभेत करण्यात येणार आहे .

तरी जास्तीतजास्त भंडारी बांधवांनी ह्या सभेस उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आपणास करण्यात येत आहे. धन्यवाद.

सभेपुढील विषय:

१) मागील सभेचे ईतिवृतांत वाचन व मंजूर करणे.

२) रविवार दिनांक २८ जुलै रोजी होणाऱ्या “विद्यार्थी गुणगौरव सोहळा“कार्यक्रमाची रूपरेषा, प्रोटोकॉल आणि अंतिम तयारी याबाबत चर्चा करणे.

३) रविवार दिनांक २८ जुलै रोजी होणाऱ्या “विद्यार्थी गुणगौरव सोहळा“कार्यक्रमाच्या खर्चाला मान्यता देणे.

४) अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: