रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये समान संधी केंद्र व एनएसएस च्या वतीने नवीन मतदार नोंदणी शिबिर कार्यक्रम आयोजीत केला. या शिबिर मध्ये 94 विद्यार्थांची नोंदणी केली. नोंदणी करिता महसूल कर्मचारी यानी सहकार्य केले.
या वेळी नायब तहसीलदार सारिका धात्रक , प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे , समता दूत राजेश राठोड, विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. पंकज आष्टणकर, मेकैनिकल विभाग प्रमुख यशवंत जीभकाटे, समान संधि केन्द्राचे अधिष्ठाता डॉ. महेश मावळे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी उद्धल हटवार, ईएसएच विभाग प्रमुख गजानन शर्मा , निवडणूक विभागाचे सुधीर कामडी, जितेंद्र देवांगने व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
नायब तहसीलदार सारिका धात्रक यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की निवडणुक हा लोकशाहिचा मोठा उत्सव आहे. 18 वर्ष्यावरील सर्व मतदातारानी नोंदनी करावी. मतदार नोंदनीसाठी व्होटर हेल्पलाईन अँप किंवा ऑफलाईन द्वारे नोंदनी करावी . नोंदनी करीता आधार कार्ड जरूरी आहे. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे मार्गदर्शन पर म्हणाले की 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी व मतदाता कार्ड तयार करावे.