Monday, December 23, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नावाने होणाऱ्या खंडणीवसुलीबाबत...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नावाने होणाऱ्या खंडणीवसुलीबाबत…

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचा आदेशाने नागपूर जिल्ह्यातील रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाध्यक्ष पदावर श्री. शेखर दुंडे यांची नियुक्ती केलेली असून, सदर विधानसभा क्षेत्रात मनसे पक्षाचे नावाने काही पक्षात पदे न दिलेले व पक्षाशी संबंध नसलेले किंवा पक्षाच्या पदाचे ओळखपत्र दाखवून विविध औद्योगिक कंपन्या व शासकीय व निमशासकीय आस्थापना मधून खंडणी व पक्षाच्या कार्यक्रमाचे नावाने रोखरक्कम वसूली बाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

त्यामुळे रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्राचा जिल्हाध्यक्ष नात्याने व पक्षाची नाहक होणारी बदनामी लक्षात घेऊन, यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नावाने खंडणी मागणार्या किंवा पक्षातर्फे होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी रोखराशी सहकार्य मागणार्या पदाधिकारी अथवा अन्य कोणी व्यक्तीची तक्रार तात्काळ श्री. शेखरभाऊ दुंडे (जिल्हाध्यक्ष- रामटेक व उमरेड विधानसभा) यांचे संपर्क क्र.- ७५०७१४१३५१ यांचेवर करण्यात यावी. तसेच पक्षाचे कुठलेली कार्यक्रमास स्वेच्छेने सहकार्य करावयाचे असल्यास जिल्हाध्यक्ष यांचे पत्राविना रोख रक्कम देण्यात येवू नये. असे आवाहन श्री. शेखर दुंडे यांचेकडून करण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: