Monday, December 23, 2024
Homeराज्यनिवडणूक खर्च व उमेदवारांची अनामत रक्कम परतवण्यास टाळाटाळ...

निवडणूक खर्च व उमेदवारांची अनामत रक्कम परतवण्यास टाळाटाळ…

नरखेड – अतुल दंढारे

एक महिन्यांपूर्वी तालुक्यातील अविरोध झालेल्या सेवा सहकारी संस्थेची निवडणूक खर्च निधी व उमेदवारांची अनामत रक्कम परत करण्यास सहकार विभागाने नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी टाळाटाळ करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. निवडणूक खर्च निधी परत करण्यास उशीर होत असल्यामुळे अगोदरच डबघाईस आलेल्या सेवा सहकारी संस्था आर्थिक संकटात सापडली आहे.
नरखेड तालुक्यात ५८ सेवा सहकारी संस्था कार्यरत आहे.

शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या सोसायट्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. सर्वच सोसायट्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे निवडणूक घेणे अपरिहार्य होते. निवडणूक न घेतल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक कणा असलेल्या या सोसायट्या दुसऱ्या सोसायटीमध्ये विलीन झाल्या असत्या. निवडणुकी घेण्याकरता सहकार विभागाकडे निवडणूक खर्च निधी जमा करणे गरजेचे होते. सोसायटी कडे आर्थिक निधी नव्हता.

निवडणूक जर अविरोध झाली तर निवडणूक खर्च निधी सोसायटीला परत मिळणार होता. सोसायट्या वाचविण्याकरिता प्रत्येक सोसायटीच्या सदस्यांनी निवडणूक अविरोध करण्याचे ठरविले. सहकार खात्यात निवडणूक खर्च निधी भरण्याकरिता काही सदस्यांकडून उधार घेऊन निधी सहकार खात्यात जमा करण्यात आला.

तालुक्यातील ५८ पैकी ५३ सोसायट्यांच्या निवडणूक घेण्यात आल्यात. ५३ पैकी केवळ मोहदी दळवी व अंबाडा सायवाडा या दोनच सोसायटीच्या निवडणुका झाल्या. ५१ सोसायट्या अविरोध झाल्यात. नियमाप्रमाणे अविरोध झालेल्या सोसायट्यांच्या निवडणूक खर्च निधी सहकार विभागाने नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोसायटीला परत करणे आवश्यक होते . परंतु निवडणुका पार पडून दिडमहिण्याचा काळ लोटला तरी आजतागायत निधी परत करण्यात आला नाही.

५३ सोसायटी करिता तीन सहाय्यक निबंधक कार्यालयाचे कर्मचारी व तीन ऑडीटर नीयुक्त करण्यात आले होते. उधार रक्कम कशी परतवावी शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची असलेली सेवा सहकारी संस्थेचे अस्तित्व टिकविण्याकरिता आर्थिक स्थिती नसताना काही सभासदांकडून उधार घेऊन निवडणूक खर्च निधी जमा केला. आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक अविरोध केली. निधी परत मिळाला की देण्याकर्यांचे देने देऊ असे ठरले. निवडणूक होऊन दीड महिना लोटला परंतु अजूनपर्यंत निधी परत मिळाला नाही . त्यामुळे सोसायटी समोर आर्थिक संकट उभे झाले आहे.
रामराव झाडे , अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी नरखेड उमेदवारांची अनामत रक्कमेचा ही परतावा नाही प्रत्येक सोसायटी मध्ये १३ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारा करिता पाचशे तर मागासवर्गीय उमेदवारा करिता दोनशे अनामत रक्कम घेण्यात आली होती. निवडणुकीनंतर नियमाप्रमाणे उमेदवारांची अनामत रक्कम परत करायला पाहिजे परंतु तीही परत करण्यात आली नाही. राजेंद्र वानखडे संचालक, सेवा सहकारी सोसायटी नरखेड

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: