अमरावती – दुर्वास रोकडे
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिननिमित्य जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप नरवणे, वैद्यकीय अध्यापिका कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्राचे डॉ. अतुल पाटील, डॉ. संगीता सौंदळे, जिल्हा जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा पर्यवेक्षक प्रकाश शेगोकार आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आरडीआईके महाविद्यालय बडनेरा, राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, एचआईव्हीची संक्रमाणाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वसामान्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक असून युवकांची भूमिका मोलाची आहे. यासाठी तरुणानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
रन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय, रेड रि्बन क्लबचे सदस्य, स्वयंसेवी संस्था व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता. स्पर्ध्येमध्ये पुरुष गटातून प्रथम उजर खान, द्वितीय नितीन हिवराडे, तृतीय प्रतीक गेडाम यांनी तर महिला मध्ये प्रथम क्रमांक सलोनी लोहाले, द्वितीय पायल मगर्दे, तृतीय मनवा पाबळे यांनी मिळवले. स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पुढील महिन्यात होणाऱ्या राजस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतील.
स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. शुभम सोनोने, छगन बोंबले यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक प्रमोद मिसाळ व अजय खेडकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता दामोदर गायकवाड, नरेश मंथापुरवार, किशोर पाथरे, प्रवीण म्हसाळ, अमोल मोरे, वृशाली घडेकर, देवश्री राणे, . कसुद सौदागर, प्रमोद कळमकर, सूरज भोयर, निखिल राऊत व लोकेश पवार यांनी परिश्रम घेतले.