Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingरिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरुणांना भररस्त्यात बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल... 

रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरुणांना भररस्त्यात बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल… 

औरंगाबाद – ऋषिकेश सोनवणे

फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटांनी दोन तरुणांना भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी शहरातील कॅनॉट परिसरात घडली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चारपाच रिकव्हरी एजंट दोन तरुणांना बेल्ट, दांड्याने बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अचानक रिकव्हरी एजंटांनी तरुणांना मारहाण सुरु केल्याने कॅनॉट परिसरात खळबळ उडाली होती.शहरातील कॅनॉट परिसरात आज दुपारी अचानक चार ते पाच तरुणांनी काठ्या , बेल्टने दोघांना बेदम मारहाण सुरु केली. समोरचे तरुण हात जोडून विनंती करत होते. पण त्यांनी एकाला खाली पाडत पुन्हा मारहाण सुरु केली.

लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण करण्यात आली. प्राथमिक माहिती नुसार, मारहाण करणारे एका फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट आहेत. तर समोरचे तरुण ग्राहक आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: