Wednesday, July 17, 2024
spot_img
Homeराज्यपोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना निरोप आणि नूतन पोलीस अधीक्षक संदीप...

पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना निरोप आणि नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे स्वागत समारंभ कृष्णा मॅरेज हॉलमध्ये संपन्न…

सांगली – ज्योती मोरे.

सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पुण्यात पोलीस उपमहानिरीक्षक पदी पदोन्नती आणि बदली झाल्याने त्यांना निरोप देत नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा स्वागत समारंभ आज एक फेब्रुवारी रोजी कृष्णा मॅरेज हॉलमध्ये सायंकाळी साडेसात वाजता मोठ्या आनंदात पार पडला.

दरम्यान,सांगली जिल्ह्यात काम करत असताना जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे सहकार्य गेल्या पंधरा महिन्यात लाभल्याचे मनोगत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी व्यक्त केली, तर आगामी काळातील निवडणुका सुरळीत पार पाडणे त्याचबरोबर गुन्हेगारी मोडीत काढून त्यावर पूर्णतः अंकुश आणणे,वाहतूक व्यवस्थेतेचे नियमन करणे,

या प्राथमिक जबाबदाऱ्यांसह पोलिसांची कार्यक्षमता वाढवून सागली पोलिस दलाचा गौरवशाली इतिहास जागा ठेवण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: