Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहावितरण अमरावती परिमंडळात उद्देशिकेचे वाचन...

महावितरण अमरावती परिमंडळात उद्देशिकेचे वाचन…

अमरावती – संविधान दिनानिमित्त महावितरण अमरावती परिमंडळात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.यावेळी मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ पुष्पा चव्हाण यांनी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी ,अभियंते व कर्मचाऱ्यांसोबत सामुहीकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी माहीती देतांना उप विधी अधिकारी प्रशांत लहाने म्हणाले की,संविधान घरा-घरात पोहचावा,नागरीकांना आपले अधिकार आणि कर्तव्ये कळावी या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २०१५ पासून प्रत्येक कार्यालयात सामुहीक उद्देशिकेचे वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देण्यात येते. यावेळी कार्यकारी अभियंता प्रशासन भारतभुषण औगड,प्रणाली विश्लेषक नितीन नांदुरकर,व्यवस्थापक सुहास देशपांडे,अतीरिक्त कार्यकारी अभियंता डोंगरदिवे,बिपीन श्रीरावसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: