कोल्हापूर – राजेद्र ढाले
प्राथमिक विद्या मंदिर,उजळाईवाडी (ता. करवीर) तेथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पुस्तकाच्या झोळीतील पुस्तकाचे वाचन केले.या कार्यक्रमासाठी प्रेरणा व मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील ,विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर ,केंद्रप्रमुख शंकर पाटील यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी मोहन सातपुते, दोलत कांबळे ,वृत्तपत्र विक्रेते प्रमोद ब्रह्मदंडे, हेमंतकुमार खामकर,नजीर मदार,अमोल साळुंखे आदींना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कागल पं. स माजी विस्तार अधिकारी बंडोपंत संकेश्वरे, मुख्याध्यापक याकूब ढोले,शिक्षक रोहिणी शिंदे, सुचिता विभुते, सौ संगीता चांदणे,श्रीम मंदाकिनी घोंगडे, संयोगीता महाजन, धनश्री शिंदे, अतुल सुतार व सर्व पालकवर्ग,ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
बालवक्ता रेहान शकील नदाफ यांनी डॉ. ए .पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा प्रवास उलगडून दाखवला तर युमना शकील नदाफ हिने ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वेश भुषेत सहभागी झाली होती. या चिमुकल्या बहीण भावानी कार्यक्रमाची उंची वाढवली.