Friday, October 18, 2024
Homeराज्यविद्यापीठाची उन्हाळी - 2024 एम.ए.(इंग्रजी) सेमि-4 (सी.बी.सी.एस.) मधीलकोलोनियल व पोस्ट कोलोनियल लिट्रेचर...

विद्यापीठाची उन्हाळी – 2024 एम.ए.(इंग्रजी) सेमि-4 (सी.बी.सी.एस.) मधीलकोलोनियल व पोस्ट कोलोनियल लिट्रेचर विषयाची पुनर्परीक्षा ३१ जुलै रोजी होणार…

विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती – दुर्वास रोकडे

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-2024 एम.ए. (इंग्रजी) सेमि-4 (सी.बी.सी.एस.) परीक्षेमधील कोलोनियल व पोस्ट कोलोनियल लिट्रेचर विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याबाबतची तक्रार विद्याथ्र्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. प्राप्त तक्रारीवर विद्यापीठ प्राधिकारिणींनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर विषयाची पुनर्परीक्षा दि. 31 जुलै, 2024 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत विद्याथ्र्यांना यापूर्वीच देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.

तसेच सदर परीक्षेकरीता यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र व परीक्षा क्रमांक कायम राहतील, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी कळविले आहे. यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना पत्राव्दारे कळविण्यात आले असून संबंधित विद्याथ्र्यांना याबाबत महाविद्यालयांनी तातडीने अवगत करावे व काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांचेशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: