युवा गर्जना उत्सव समिती मनसर तथा शिव गर्जना युवा प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन…
रामटेक – राजू कापसे
उद्या दिनांक ५ ऑक्टोंबर ला युवा गर्जना उत्सव समिती मनसर तथा शिव गर्जना युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुर – जबलपुर महामार्गावरील मनसर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिराच्या प्रांगणात रावण दहन उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमाचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजनकर्त्यांनी केलेले आहे.
दरम्यान जि.प. सदस्य तथा आयोजन समितीचे पदाधिकारी श्री. सतीश डोंगरे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की येथे अनेक वर्षापासून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते याही वर्षी उद्या पाच ऑक्टोबरला या रावण दहन उत्सव 2022 चे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रारंभी मंचर येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथून जात्या निघणार आहेतत्याचप्रमाणे श्रीरामांच्या पालखीचे आयोजन सुद्धा राहणार असून झाक्या व पालखी राष्ट्रीय आदर्श विद्यालयापासून निघून त्या श्री चक्रधर स्वामी मंदिर येथे येतील व येथे नंतर रावण दहनाचा कार्यक्रम होईल. समाजबांधवांकडुल कलेक्शन करून सदर कार्यक्रम उभा करण्यात आलेला असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली.
या संपूर्ण उत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य तथा आयोजन समितीचे पदाधिकारी सतीश डोंगरे यांचेसह नंदकिशोर चंदनखेडे , प्रवीण जत्रे , पंकज मोहनकर , दीपक शिवरकर , योगेश उईके , प्रदीप नगरकर , अनील अहाके, शुभम तलमले, सुकेश डुमरे , धर्मदीप कुंभरे आदिंनी केलेले आहे.