Tuesday, December 24, 2024
Homeराज्यदिल्लीत होणाऱ्या मेळाव्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २०० आशा व गटप्रवर्तक महिला जाणार...

दिल्लीत होणाऱ्या मेळाव्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २०० आशा व गटप्रवर्तक महिला जाणार…

सांगली – ज्योती मोरे.

रत्नागिरी महिला मंडळ सभागृहात आशा व गटप्रवर्तक महिलांचा २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या मेळाव्यामध्ये 28 मार्च रोजी दिल्ली येथे होणाऱ्या आशा महिला मोर्चासाठी 200 महिला रत्नागिरी जिल्ह्यातून जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देशातील दहा लाख आशा गटप्रवर्तक महिलांना व सर्वच योजनाकर्मी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे यासाठी दिल्ली येथे आयटक कामगार संघटनेच्या वतीने 28 मार्च रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.

त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून 200 महिला जाण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी हे होते. या मेळाव्यास मार्गदर्शन करीत असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई व आयटकचे नेते कॉ प्रकाश रेड्डी मुंबई यांनी सांगितले की, सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी देशव्यापी तीव्र आंदोलन करावे लागणार आहे त्याची तयारी करावी असे त्यांनी आवाहन केले.

त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की रत्नागिरी जिल्ह्यामधील एक झुंजार पत्रकार श्री शशिकांत वारिसे यांचा पूर्व नियोजित कट करून खून करण्यात आला. या कृत्याचा मेळाव्यामध्ये निषेध करण्यात आला. शशीकांत वारीसे यांनी राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पामधील गैर व्यवहार उघड करण्याचा कसून प्रयत्न केला म्हणूनच त्यांना त्यांचा बळी घेण्यात आलेला आहे. असे कॉ प्रकाश रेड्डी यांनी सांगितले. याबाबत आशा महिलांच्या मेळाव्यामध्ये अपघात झाल्याच्या नावाखाली शशिकांत पारिसे यांचा खून करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले.

मेळाव्यामध्ये मध्ये बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची तयारी महाराष्ट्र शासनाची नसल्यामुळे त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेलीच आहे.

दरम्यान सन 2018 सालापासून भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक महिलांच्यासाठी काहीही मानधनांमध्ये वाढ केलेली नाही. म्हणूनच सर्व योजनाकर्मी कर्मचाऱ्यांना दरमहा ताबडतोब पंचवीस हजार रुपये किमान वेतन सुरू झाले पाहिजे.यासाठी दिल्लीच्या मोर्चासाठी जोरदार तयार करावी असे सांगितले.

या मेळाव्यामध्ये बोलताना महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी सांगितले की. सर्व महाराष्ट्रातून दिल्ली मोर्चास जाण्याची तयारी सुरू आहे. म्हणूनच कोकणामधून सुद्धा जोरदार तयारी करावी असे आवाहन केले. या मेळाव्यामध्ये विद्या भालेकर, पल्लवी पारकर, तनुजा कांबळे, वैशाली तांबट व संजीवनी तिवडेकर इत्यादी आशा महिलांनी आपली भूमिका व्यक्त केली.

मेळावा संपल्यानंतर कॉ प्रकाश रेड्डी, कॉ शंकर पुजारी, रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण व सुमन पुजारी यांनी शशिकांत वारीसे यांच्या कुशीले गावामध्ये जाऊन त्यांच्या मुलाची भेट घेऊन आशा वर्कर युनियनच्या च्या वतीने दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले. या पुढील काळामध्ये सुद्धा ज्या ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांच्या वर अन्याय होईल त्या ठिकाणी सक्रियपणे आशा महिला त्या अन्याया वृद्ध पत्रकारांच्या बरोबर संघर्षामध्ये सहभागी होतील असे स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: