मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील खेड्यापाड्यात जाऊन तांदुळाची खुलेआम खरेदी करणारा रेशन माफिया बर्याच दिवसांपासून सक्रीय झाला असून त्याला तालुका पुरवठा अधिकारी व काही पोलीसांच पाठबळ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तो कोणाला न घाबरता खुलेआम तांदळाची खरेदी करतो. हा माफिया शहरातील जुन्या वस्तीतील असल्याची चर्चा आहे.
कसा चालतो हा व्यवसाय –
शासना कडून गहू व तांदूळ हे रेशन दुकानदार पर्यंत पोहचवले जाते नंतर रेशन धारक रेशन दुकानावर जाऊन आपले थम लावतात जर तुम्हाला गरज नसेल तर तांदुळाच्या बद्दल गहु घ्या किंवा निम्म्या भावाचा हिशोबाने किलो प्रमाणे हे तांदूळ रेशन दुकानदार विकत घेतात व हे तांदूळ भाव वर चडवुन किलो प्रमाणे तांदूळ विकत घेणाऱ्या टोळीला विकतात .
जे लोक तांदूळ घरी घेऊन जातात मग तांदूळ विकत घेणारी टोळी गावो गावी फिरून अधिक भाव वर चडवून किलो प्रमाणे ने विकत घेते व परराज्यात जाऊन त्यापेक्षा अधिक नफ्यावर परराज्यात विकते. परराज्यात घेऊन जात असताना हे टोळी हुबेहूब नकली बिल्टी बनवितात किंवा चोरून याची स्मगलिंग करतात.
हा विषय फक्त आपल्या तालुक्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. पण मजेशीर गोष्ट अशी आहे की आपल्या तालुक्यात या माफियाचा एकाधिकार चालतो.त्या मध्ये सगळे संबंधित अधिकारी व संबंधित प्रशासनाचा संगनमताने जर कोणी दुसरी टोळी तांदूळ घेताना आढळली तर एकाधिकार टोळी चे मालक तिथे जातात व संबधित प्रशासन किंवा पुरवठा अधिकारी यांना तिथे बोलवितात त्याचा जवळ जे काही तांदूळ भेटेल ते अर्धे तांदूळ काळा बाजारी करणारी टोळी घेते व 2 ते 3 पोते तांदुळाची केस अधिकारी वर्ग व प्रशासना बनवतो नंतर आरोपीला सांगण्यात येते की जर व्यवसाय करायच असेल तर अमुख अमुखं माणसाला माल द्या, मग सक्रिय तांदूळ टोळीचा बॉस तिथे येतो व त्याला आपली पॉवर दाखवीत त्याला पैसे भरून सोडवण्यास सांगतो व पुढच्या काळात जर इकडे दिसला तर हे नॉन बेलेबल केस आहे पुढच्या वेळेस तुला सोडणार नाही धंदा करायचा असेल तर मला माल द्यावा लागेल. तुला कोणी अधिकारी त्रास देणार नाही.
जर तो व्यक्ती बॉसला तांदुळ देत असेल आणि अधिकाऱ्याला कुठली केस हवी असेल तर टोळी बहाद्दूर नवीन परत त्या माणसाची टीप देतो आणि त्यादिवशी बॉस चे मोबाईल बंद असते किंवा बॉस फोन उचलत नाही. अशा घटना अनेक वेळी आपल्या तालुक्यात घडल्या आहे.
अशीच एक घटना जूनिवस्ती येथे एक किराणा दुकानदार सोबत पण घडली असून तो आता ऑटो सोडून आपल्या ॲक्टिवा वर बाकी दुकानदाराचे माल जमा करतो व बॉसला देतो. एक वेळेस तर हद्द झाली मूर्तिजापूर पुरवठा विभागाने बाळापूर व्यापाराची गाडी पकडली होती पण मात्र सेटेलमेंट झाल्याने ती गाडी सोडण्यात आली असे दाखिवले की हा तांदूळ शासकीय नव्हता. व परत तीच गाडी बाळापूरला जात असतांना बोरगाव पोलिस स्टेशन ने त्या वर गुन्हा दाखल केला असे अनेक किस्से तालुक्यात आहे. गंमत अशी की हे अरेरावी एकाधिकार रेशन दुकानदार वर पण चालते. दोन नंबर चा धंदा करताना कोणाचा भरवशावर एकाधिकार व अरेरावी चालते याचे उत्तर कोणाकडे ?..लवकरच या तांदूळ माफियाचा भांडाफोड होणार आहे.