रामटेक – राजू कापसे
परमात्मा एक आनंदधाम, रामटेक चे संचालक व महाराष्ट राज्य व्यसनमुक्ती पूरस्र्कुत लक्ष्मणराव (बाबूजी) मेहर यांच्या तर्फे दि.५/९/२०२३ सोमवारी भगवान बाबा जुमदेवजी भगवतप्राप्ती प्रगट दिनानिमित्त शहरातून रथयात्रा काढण्यात आली. त्यानंतर आनंदधाममध्ये हजारो स्त्री-पुरुषांची चर्चा बैठक झाली. पाहुणे, मार्गदर्शक, रथयात्रेत सहभागी झालेले कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळी १० वाजता कालंका मंदिर परिसरातून रथयात्रेला सुरुवात झाली. आनंदधामचे संस्थापक लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अनिल वाघमारे, वाइल्डलाइफ चॅलेंजर असोसिएशनचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांच्या हस्ते लाल फिती कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, सरपंच अपर्णा वासनिक, उपसरपंच नीळकंठ महाजन, पी.टी. रघुवंशी, राजू हटवार, शारदा बर्वे, बबलू पचारे, अजय मेहरकुळे इ.उपस्थित होते. शितला माता चौक, शास्त्री चौक, गांधी चौक,डाॅ. आंबेडकर चौक, बस स्टँड चौक मार्गे रथयात्रा आनंदधाम येथे पोहोचली. रथयात्रेत बाबा जुमदेव यांचे फोटो, अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्ती यावर आधारित कलाकारांचा समावेश होता.
बाबा जुमदेव यांच्यासह विविध महापुरुषांची वेशभूषा केलेले स्पर्धक सहभागी झाले होते. रामटेक शहर भ्रमण करतांना ठिकठिकाणी रथयात्रेचे स्वागत व पुष्पवृष्टी करण्यात आली. मिठाई, स्नॅक्स,पाणी व सरबत वाटप करण्यात आले. गांधी चौक व आंबेडकर चौकात नृत्य सादर करण्यात आले. रथयात्रा आनंदधाम येथे पोहोचल्यावर चर्चा बैठक झाली.
मुख्य संयोजक लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपप्रज्वलन करण्यात आले.कायक्रमाचे अध्यक्षपदी नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, विशेष सत्कारमूर्ती म्हणून आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी,रामधामचे संचालक चंद्रपाल चौकसे, भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी,माजी जि.प.सदस्य नरेश धोपटे, पंकज जोशी, विकेंद्र महाजन, दामोधर धोपटे, बबलू पटेल, किशोर खडोदे,
नंदकिशोर तांडेकर, कांचनमाला माकडे, ज्योती कामडी आदींचा गौरव करण्यात आला. तर पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, समाजसेविका ज्योती कोल्लेपारा, गोपी कोल्लेपारा, हुकुमचंद बडवाईक, राहुल कोठेकर, रमेश बिरनवार आदींचा सामाजिक कार्याबद्दल आमदार जयस्वाल व कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय हटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
उत्कृष्ट संयोजन, झांकी थीम, सजावट, कलाकार, महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी असलेले लोक, रथयात्रेत सहभागी मुला-मुलींना बक्षीस देण्यात आले. संचालन सीमा नागपुरे यांनी केले. कार्यक्रमात शेकडो स्त्री-पुरुषांचा सहभाग होता.