Monday, December 23, 2024
Homeराज्यमहात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळाला १००० कोटींचा निधी द्यावा राष्ट्रीय लिंगायत संघाची मागणी...

महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळाला १००० कोटींचा निधी द्यावा राष्ट्रीय लिंगायत संघाची मागणी…

सांगली – ज्योती मोरे

राज्याच्या बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करून यासाठी 50 कोटींचा निधी जाहीर केला आहे ,परंतु राज्यात दीड कोटीच्या आसपास असणाऱ्या या समाजासाठी 50 कोटी निधी अपुरा असून तो वाढवून 1000 कोटी करावा,

अशी मागणी राष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाले आणि सांगली महापालिका क्षेत्राध्यक्ष नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी केली आहे. दरम्यान सांगलीतल्या नाट्यगृहासाठी 25 कोटी एखाद्या विधानसभेसाठी 300 कोटी रुपये दिले जातात. पण महाराष्ट्रातील दीड कोटी लोकसंख्येच्या लिंगायत समाजाला दिला गेलेला हा निधी तुटपुंजा असल्याचा सुर यावेळी उमटला आहे.लिंगायत समाजाला अल्पसख्याक दर्जा मिळावा,लिंगायत धर्माला मान्यता मिळावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: