रामटेक – राजु कापसे
“वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी महोत्सव” रामटेक ला” नरक चतुर्दशीच्या” दिवशी महाराजांच्या अस्ति आल्यामुळे याच दिवशी पुण्यतिथी चा कार्यक्रम ,”रामटेक गुरुदेव सेवा” मंडळाच्या वतीने दरवर्षी घेतला जातो. दिनांक 11 /11/ 2023 ला “गुरुकुंज आश्रम बालोद्यान “रामटेकला सकाळी तीर्थस्थापना झाली, सायंकाळी ध्यानधारणा, सामूहिक प्रार्थना, ग्रामगीता वाचन, भजनी मेळावा घेण्यात आला.
यात” सद्गुरु भजन मंडळ”,” जलाराम भजन मंडळ”,” महारुद्र भजन मंडळ” यासह “गुरुदेव सेवा मंडळ “यांनी सहभाग घेतला. दिनांक 12 /11 /2023ला सकाळी रामधुन काढण्यात आली. ध्यानधारणा करण्यात आली. नंतर “हरिभक्त परायण शेंडे महाराज” यांचे “काल्याचे किर्तन सेवा “देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ग्रामगीताचार्य ,ग्राम सेवा अधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ नागपूर ,”श्री मोरेश्वर दामोदर माकडे सर “यांनी केले या कार्यक्रमाला श्री श्रीधर पुंड सर ,नंदू पापडकर ,नंदू नेरकर ,प्रसाद महाजन ,महेश सुरसे, धनराज महाजन ,राजू देशमुख, एकनाथ उईके, करण कडूकाळे, मधुकरराव कुर्वे, मनोहर बावनकर, अनिल मिरासे, हेडाऊ काकाजी यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने “नागार्जुन संस्थान सेवाश्रम चे महंत ब्रह्मलीन गुरुवर्य,” कैलास पुरी महाराज”,” हरिभक्त परायण विजय महाजन महाराज” चौगाण,”हरिभक्त परायण प्रकाश ठाकरे महाराज”, मेंगरे भाऊ, सुनंदा जांभुळकर, शाहीर परिषदेचे शाहीर परिषद प्रमुख,” प्राध्यापक समर मोडघरे “,सहित मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त बालगोपाल कार्यक्रमाला हजर होते.