अकोल्यातील हमजा प्लॉट येथील रहिवासी रशेदा परवीन उर्फ रुबिना खान यांना सामाजिक क्षेत्रातील, लेखक आणि साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिल्लीत सन्मानित केले आहे. बहुचर्चित “किसी के भाई किसी की जान” या सलमान खान यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शक फराद सॅम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
रशेदा परवीन यांना नारी शक्ती बरोबर सैल्यूट पुरस्कार देण्यात आला दिल्लीच्या अलिशान हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला असून “किसी के भाई किसी की जान” चित्रपटाचे दिग्दर्शक फराद सॅम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी चित्रपट कलाकार अली खान, प्रेम जी, आरिफ खान (अनिल कपूर) टाऊन मोथा उपस्थित होते. या यशाबद्दल अकोलावासीयांना रशेदाचा अभिमान आहे. त्यांनी अकोल्याचा नावलौकिक देशभरात मिळवला.