रामटेक – राजु कापस
रामटेक शहरातील कालंका मंदिराजवळ दिनांक ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, अन्यात व्यक्तीना विचित्र प्राणी असल्याचे दिसले त्यांनी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझर संघटक प्रमुख सागर धावडे यांना माहीत दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याचे आढळून आले.
सहसा हा प्राणी एकटा राहतो आणि केवळ प्रजननासाठी नर मादी भेटतात असे सांगत हल्ली खवले मांजराची मांसासाठी शिकार केली जात असल्याचे सांगत, सुरक्षित वन क्षेत्र कमी झाल्याने ते मानवी वस्तीत आढळल्याची माहिती सर्पमित्र सागर धावडे यांनी दिली
सदर खवले मांजराच्या एकूण आठ प्रजाती अस्तिवात असून सर्व प्रजातीची त्याच्या खवल्यासाठी शिकार केली जात असल्याने इंटरनॅशनल युनियन फॉर कंझरर्वेशन ऑफ नेचरने खवले मांजराच्या सर्व प्रजातीना रेड लिस्ट मध्ये समाविष्ट करुन क्रिटीकली एनडेजेड घोषित केले आहे. खवले मांजराच्या खवल्याना चायनीज औषधशास्त्र मध्ये खूप मागणी असल्याने त्याची शिकार करण्याची शक्यता असते. सदर वन्यप्राणी मुंग्या, उधळी खाऊन जगतो.
खवले मांजर हा वन्यप्राणी अतिशय दुर्मिळ असल्याने त्याचे संरक्षण करणे गरचे चे आहे. त्यामुळे त्याची शिकार व विक्री भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा असून त्यात कठोर शिक्षचे प्रावधान आहे. त्यामुळे खवले मांजर असो किंवा कोणतेही वन्यप्राणी ईजा न करता वन विभागाला सूचित करावे असे आवाहन सर्पमित्र सागर धावडे यांनी केले.
जीविताला धोका असल्याने जागरुक नागरिकांनी प्रसंगावधान राखून या दुर्मिळ प्रजातीला वाचवल्या बद्दल सर्पमित्र सागर धावडे यांनी आभार मानले तसेच रामटेक वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत आणि चोरबाहुलीचे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे याचा मार्गदर्शनाखाली राऊंड ऑफिसर खंडाई तसचे वन कर्मचारी याचा उपस्थित नजीकच्या वन क्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.