Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयराणांनी आईला मधात आणून घाणेरडे राजकारण करू नये...आमदार बच्चू कडू

राणांनी आईला मधात आणून घाणेरडे राजकारण करू नये…आमदार बच्चू कडू

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. नुकताच राजापेठ पोलीस ठाण्यात महिलांनी बच्चू कडू विरोधात तक्रार दिली आहे यात रवी राणा यांच्या आईवर अपशब्द वापरल्याच सांगण्यात येत आहे. मात्र आमदार बच्चू कडू यांनी हा आरोप फेटाळून लावत रवी राणा यांना चांगलच सुनावलं…

यावर बच्चू कडू म्हणाले, मी आमदार रवी राणांच्या आईवर बोललो नाही राणानी हे घाणेरडे राजकारण करू नये राणा यांच्या आरोपाविरोधात 50 कोटी रुपयांचा दावा देखील ठोकणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे स्वतःला लपण्यासाठी आईला समोर करत असल्याचा आरोप देखील यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे…तर त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या वादात मध्यस्थी करणार का, हे पाहावे लागेल.

बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. याविरोधात दाद मागूनही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात अद्याप कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांनी सरकारची साथ सोडून वेगळ्या वाटेने जाण्याचा इशारा दिला होता. बच्चू कडू टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.तर सोबतच १ तारखेला रवी राणा यांच्या बैठकीतील Video रिलीज करणार असल्याचे म्हणाले होते. नेमक काय असणार त्या Video मध्ये ते तारखेला समोर येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: