Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेकच्या तारण तरण दि. जैन चैत्यालय मंदीरात चोरी...

रामटेकच्या तारण तरण दि. जैन चैत्यालय मंदीरात चोरी…

चोराट्यांनी ४५ हजार रुपयावर मारला डल्ला

रामटेक – राजु कापसे

रामटेक शहरातील मध्यवर्ती भागातील शास्त्री चौक येथील तारण तरण दि. जैन चैत्यालय मंदीरात मध्यरात्रीच्या सुमारास चोराट्यांनी दानपेटी फोडुन अंदाजे ४५ हजार रुपये लंपास केल्याची खळबळ उडाली आहे, शास्त्री चौक रामटेक मधील तारण तरण दि. जैन मंदील हे अतिशय गजवजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शास्त्री चौकात तारण तरण मंदीर असुन भाविक हे सकाळी दर्शनासाठी मंदीरात येत असतात. मंदीराचे सचिव रात्री नेहमीप्रमाणे मंदीराचे दार बंद करण्यात आला होता. तोच सकाळी सचिव निरज राउत हे पुजा करण्यासाठी मंदीरातआले असता त्यांना दरवाज्याचा लाँक हा तोडल्याचे निदर्शनात आले.

त्यांनी तातडीने रामटेक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला मध्यरात्री हा प्रकार घडल्याच अंदाज व्यक्त केला जात आहे. मंदीराच्या मुख्य दरवाजा तोडुन चोराठ्यांनी आतमध्ये प्रवेश करुन मंदीराची दानपेटी फोडुन अंदाजे ४५ हजार रुपयावर डल्ला मारला. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात अज्ञात चोराट्यावर अप क्र. २७४/२४ कलम ४५७ , ३८० भादवी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शना खाली रामटेक पोलीस करीत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: