Saturday, November 23, 2024
Homeराज्यरामटेकच्या राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष् महाविद्यालयात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी...

रामटेकच्या राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष् महाविद्यालयात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी स्नेहसंमेलनाचे आयोजन…

माजी मंत्री सुनील केदारहस्ते आज उद्घाटन

रामटेक – राजु कापसे

रामटेकच्या राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या हस्ते अकरा वाजता संपन्न होणार आहे. स्नेहसंमेलन 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, एकांकिका, रांगोळी, वेशभूषा, नृत्य स्पर्धा, तसेच प्राथमिक विभागातर्फे आदिवासी नृत्य, काश्मिरी नृत्य, नाटक, एकांकिका, पाककला, चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्या कलेचे कौतुक पालकांनी व रामटेक व रामटेक परिसरातील लोकांनी करावे, म्हणून दरवर्षणीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते,असे संस्थेचे सचिव श्री मयंक देशमुख यांनी सांगितले.

विद्यार्थी हेच शाळेचे दैवत असून, पुढे ते देशाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या कलागुणांना उभारी देण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल,ते संपूर्ण करण्याचे त्यांनी भावना व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री आनंदराव देशमुख यांनी 1956 ला राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ रामटेक ची स्थापना करून, रामटेक तथा 1958 ला राष्ट्रीय आदर्श विद्यालय मनसर शाळेची स्थापना केली.

मॅंगनीज परिसरात अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, म्हणून गरिब विद्यार्थ्यांसाठी मनसर येथे शाळा सुरू केली. 1962 ला नवेगाव खैरी येथे राष्ट्रीय आदर्श विद्यालय स्थापन केले. त्या ठिकाणी आदिवासी समाज अति दुर्गम भागात राहत असून, कोलीत मारा व इतर गाव खेड्यातून आदिवासी व गरीब विद्यार्थी शिकायला येतात.

रामटेक येथे कला व विज्ञान कला शाखा स्थापन करून त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन सुरू केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार आनंदराव देशमुख, सचिव मयंक देशमुख, उपाध्यक्ष अंशुल देशमुख, संचालक नारायणराव देशमुख,शामराव सेलोकर साहेब, निळकंठ महाजन, बर्वे साहेब, होमराज हजारे, दुर्गाताई रागीट इत्यादी संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला विशेष अतिथी आमदार जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी मंत्री राजेंद्र मुळक, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे, कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरिराम त्रिपाठी, गटशिक्षणाधिकारी रामटेक, नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजू कुसुंबे, शिक्षक आमदार आडबायले, शाळेच्या संचालिका जयश्री रागीट, स्नेहसंमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

रामटेक तथा रामटेक परिसरातील नागरिकांनी, पालक वर्गाने कार्यक्रमाचा व इतर स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव मयंक देशमुख यांनी केले आहे. राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक चे प्राचार्य राजू बर्वे, तथा प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री टोनगसे यांनीही पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: